भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना एअरलिफ्ट करून मुंबईत आणण्यात आलं आहे. मुंबईतल्या कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार आहे. त्यांच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळहून मुंबईत आणण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे.
सर्व महत्वाच्या केसेस वाझेंकडेच कशा सोपवल्या जातात?
प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती शुक्रवारी म्हणजेच ५ मार्च तारखेला संध्याकाळी बिघडली. त्यांचं ब्लडप्रेशर अचानक वाढलं. अनेक प्रयत्न करून त्यांचा उच्च रक्तदाब कमी झाला नाही. आज म्हणजेच ६ मार्चला त्यांना श्वास घेण्याचाही त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना आज एअरलिफ्ट करून कोकीलाबेन रूग्णालायत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. चार्टर्ड विमानाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. डिसेंबर २०२० मध्ये त्यांना कोरोनाचाही संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोण आहेत प्रज्ञा सिंह ठाकूर?
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळच्या खासदार आहेत. त्यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गंभीर आरोप आहेत. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. त्यांच्याविरोधात मुंबईतील सेशन कोर्टात खटला सुरू आहे.