राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज साताऱ्यात झालेल्या शरद पवारांच्या पावसातल्या सभेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “शरद पवारांनी रिटायर्ड झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.मात्र शरद पवारांना रिटायर्ड करायचं हे महाराष्ट्राने ठरवलं नव्हतं. मग एक देवेंद्र फडणवीस काय करणार? अख्खा महाराष्ट्र एकीकडे राहिला आणि देवेंद्र फडणवीस एका बाजूला राहिले. त्यावेळी जर शऱद पवारांनी असा विचार केला असता की देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत तर मी रिटायर्ड होतो. पण त्यांनी तसा विचार केला नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. नवी मुंबईतल्या भाषणात सुप्रिया सुळे बोलत होत्या. आपल्या भाषणात त्यांनी गणेश नाईक यांनाही काही टोले लगावले.
“दीड वर्षापूर्वी काय परिस्थिती होती? मी रोज सकाळी उठायचे आणि मला कळायचं आज कुणी पक्ष सोडला.. एखाद्या दिवशी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी सोडला नाही तर मला वाटायचं चला आज देव पावला. नेमका त्याच्या पुढचा दिवस असा असायचा की एकदम जास्त लोक सोडून जायचे. तेव्हा मी स्वतःला समजावायचे नाही 50 की 52 लोक पवारसाहेबांना सोडून गेले होते त्यातला एकही आमदार झाला नाही. पण 2019 च्या वेळेला कुठे अशी परिस्थिती होती? पण पावसातली सभा झाली आणि काय घडलं तुम्हाला माहित आहे.”
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांनी निवृत्त होणं महाराष्ट्राला मान्य नव्हतं… फिर अकेले देवेंद्र फडणवीस क्या करेंगे? देवेंद्र फडणवीस एकीकडे आणि संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे – खा. सुप्रियाताई सुळे@supriya_sule @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #navimumbai pic.twitter.com/jR6V1DinEp
— NCP (@NCPspeaks) February 19, 2021
पावसाच्या सभेचं गुपित
काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा झाली, त्याने मला सांगितलं मी साहेबांना पाहिलं की मला साताऱ्यातली सभा आठवते इतकी ती सभा गाजली. साताऱ्यातली सभेच्या वेळी जो पाऊस पडला त्याला कारण शशिकांत शिंदे आहेत. साताऱ्यातली सभा होणार नव्हती पण त्यादिवशी शशिकांत शिंदेचा वाढदिवस होता त्यांनी बोलावलं होतं आम्ही हो-नाही अशा संभ्रमात होतो. त्यादिवशी रात्री मला शशिकांत शिंदे यांनी फोन केला आणि सॉरी म्हणाले. ते म्हणाले ताई, साताऱ्यात सभा झाली आणि साहेब भिजले. मी त्यांना म्हटलं अहो माझे वडील 80 वर्षांचे आहेत त्यांच्या पायाला जखम झाली. तर त्यांनी मला सांगितलं की साहेबांनी आणि मी ठरवलं होतं की सभा करायचीच. लडेंगे तो पुरी ताकदसे या नहीं लडेंगे.. मग काय केलं? साहेब भिजले पण तरीही त्यांनी भाषण केलं. आता आम्ही सभेवरून परत आलो आहोत, माझ्या वाढदिवसाचा केक कापतो आहोत. त्या सभेला सगळा मीडिया निघून गेला होता.. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा मीडियाचा माणूस तिथे होता. ज्या कॅमेरातून त्याने फोटो काढला त्याला देशातल्या सगळ्यात चित्र पालटणाऱ्या सभेचा फोटो मिळाला. काय नियतीच्या मनात असतं हे कधीच कुणाला कळत नाही.
अमितभाई नवी मुंबईला वाचवा असं सुप्रिया सुळे का म्हणाल्या? पाहा व्हिडीओ
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अनेक लोक भाजपमध्ये गेले. कशासाठी गेले सत्तेसाठी गेले पण पावसातल्या सभेने सगळी गणितं बदलली हे आपण पाहिलं. शरद पवार हे कायमच सत्तेत नव्हते पण शरद पवार सत्तेत होते किंवा विरोधात होते पण महाराष्ट्राच्या जनतेने कधीही त्यांना अंतर दिलं नाही.