देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरच्या दिवसातही विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण सुरुच ठेवलं. सकाळी विधानपरिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात आल्याचं जाहीर केलं. परंतू वाझेंच्या अटकेवर अडून बसलेल्या विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली.

मोठी बातमी ! सचिन वाझेंची क्राईम ब्रांचमधून बदली

मंगळवारी विरोधक सभागृहात सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरण देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना दाबलं असं वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात आज सभागृहात सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं मत वाचून दाखवत देशमुख यांचं वक्तव्य हे सर्वोच्च न्यायालयाचा आणि माझा अपमान करणारं असल्याचं म्हटलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहिती असूनही त्यांनी सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सरकारला जाब विचारण्याचा माझा अधिकार आहे. त्यावेळी मला धमकावण्याचा प्रयत्न करुन मला माझ्या हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. यासाठी हे प्रकरण विशेष हक्कभंग समितीकडे देण्यात यावं अशी मागणी फडणवीस यांनी केली. ज्याला उत्तर देताना उपाध्यक्ष झिरवळ यांनी हे प्रकरण तपासलं जाईल असं आश्वासन दिलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT