चिकन-मटणाचा रस्सा, फटाक्यांची आतिषबाजी; लाडक्या रेड्याच्या वाढदिवसासाठी मालकाचा जंगी थाट

मुंबई तक

आपल्या पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी अनेक लोकं आजपर्यंत आपण अनेकदा पाहिली असतील. याच प्रेमापोटी अनेक व्यक्तींनी आपल्या पाळीव कुत्र्याचा, मांजरीचा वाढदिवस साजरा करताना पाहिलं आहे. शहापूर तालुक्यातल्या एका गावात असाच काहीसा प्रकार घडला आहे त्याची जबाबदारी चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे. शहापूरच्या गोठेघर वाफे या गावातील सुरेश अंदाडे यांनी आपल्या रामू या रेड्याचा वाढदिवस साजरा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आपल्या पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी अनेक लोकं आजपर्यंत आपण अनेकदा पाहिली असतील. याच प्रेमापोटी अनेक व्यक्तींनी आपल्या पाळीव कुत्र्याचा, मांजरीचा वाढदिवस साजरा करताना पाहिलं आहे. शहापूर तालुक्यातल्या एका गावात असाच काहीसा प्रकार घडला आहे त्याची जबाबदारी चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे. शहापूरच्या गोठेघर वाफे या गावातील सुरेश अंदाडे यांनी आपल्या रामू या रेड्याचा वाढदिवस साजरा केला आहे.

शहापूरच्या गोठेघर वाफे या गावात राहणारे सुरेश अंदाडे दर वर्षी आपल्या या लाडक्या रेड्याचा वाढदिवस असाच जंगी पद्धतीने साजरा करतात. यंदाही रामू रेड्याच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यंदा रामूच्या वाढदिवशी सुरेश अंदाडे यांनी केक कापून सेलिब्रेट केलं. त्याच्या वाढदिवसाची पार्टी देखील ठेवण्यात आली होती. या पार्टीसाठी चिकन-मटणाचा रस्सा खाण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली. सुरेश अंदाडे यांनी रेड्याच्या वाढदिवसानिमित्त अख्ख्या गावाला चिकन-मटणाचं जेवण खाऊ घातलं. तसेच, गावात रामूची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. रात्री फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. दरवर्षी रामूचा वाढदिवस असाच जंगी पद्धतीने साजरा केला जातो. त्याच्या आवडीचे पदार्थ तयार केले जातात. खास केक तयार केला जातो.

रामू रेडा हा आख्ख्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. पण सुरेश अंदाडे यांचं आपल्या रेड्यावर एवढं प्रेम का आहे ? तर या प्रश्नाचं उत्तर तालुक्यात होणाऱ्या झुंजींमध्ये आहे. रामू रेडा हा झुंज खेळण्यात तरबेज आहे. आख्ख्या तालुक्यात रामू रेड्याच्या झुंज खेळण्याच्या कौशल्याची चर्चा आहे. त्याच्या या कौशल्याच्या जोरावरच त्याला अनेक पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp