सेक्स आणि हस्तमैथुनावर पोप फ्रान्सिस यांचं मोठं विधान; सर्वत्र चर्चा

मुंबई तक

डॉक्युमेंटरीमध्ये, पोपला एलजीबीटी अधिकार, गर्भपात, पॉर्न उद्योग, लिंग, धर्म आणि कॅथोलिक चर्चमधील लैंगिक शोषण यासह विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

'द पोप आन्सर्स' या डिस्ने प्रोडक्शनच्या माहितीपटात पोपने या गोष्टी सांगितल्या आहेत.
'द पोप आन्सर्स' या डिस्ने प्रोडक्शनच्या माहितीपटात पोपने या गोष्टी सांगितल्या आहेत.
social share
google news

Pop Frances on sex and masturbation : पोप फ्रान्सिस यांनी बुधवारी प्रसिद्ध झालेल्या माहितीपटात सेक्सच्या सद्गुणांची प्रशंसा केली असून, ‘देवाने मानवाला दिलेल्या सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक’ असे वर्णन केले आहे. पोप यांनी हस्तमैथुनाबद्दलही सांगितले की सेक्स व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीमुळे सेक्सची समृद्धता कमी होते. (Pope’s big statement on sex and masturbation; There is a discussion)

Same Sex Marriage : समलैंगिक विवाहाच्या मान्यतेस केंद्राने दर्शवला विरोध

‘द पोप आन्सर्स’ या डिस्ने प्रोडक्शनच्या माहितीपटात पोपने या गोष्टी सांगितल्या आहेत. गेल्या वर्षी, पोपने 20 वर्षांच्या 10 तरुणांशी संवाद साधला आणि हा माहितीपट त्या संभाषणांवर आधारित आहे. डॉक्युमेंटरीमध्ये, पोपला एलजीबीटी अधिकार, गर्भपात, पॉर्न उद्योग, लिंग, धर्म आणि कॅथोलिक चर्चमधील लैंगिक शोषण यासह विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

सेक्स आणि हस्तमैथुन यावर पोपचे मत

डॉक्युमेंट्रीमध्ये सेक्सच्या प्रश्नावर ते म्हणतायेत, ‘देवाने माणसाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी सेक्स ही एक आहे.’ हस्तमैथुनाचा संदर्भ देताना ते म्हणाले, ‘समृद्धी म्हणजे स्वत:ला लैंगिकरित्या अभिव्यक्त करणे, त्यामुळे खऱ्या लैंगिक अभिव्यक्तीपासून विचलित होणारी कोणतीही गोष्ट तुम्हाला आणि सेक्सची समृद्धता कमी करते.’

‘एलजीबीटी समुदायाचे स्वागत केले पाहिजे’

फ्रान्सिस यांना ‘नॉन-बायनरी व्यक्ती’ म्हणजे काय हे माहीत आहे का, असेही विचारण्यात आले, ज्याला त्यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिले. आपल्या पूर्वीच्या विधानांचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की कॅथोलिक चर्चने एलजीबीटी समुदायातील लोकांचे स्वागत केले पाहिजे. ते म्हणाले, ‘सर्व मानव देवाची मुले आहेत. देव कोणालाही नाकारत नाही, देव पिता आहे आणि मला कोणालाही चर्चमधून काढून टाकण्याचा अधिकार नाही.

पहिल्यांदा सेक्स ते पॉर्न बघण्याची सवय… आलिया कश्यपने फॉलोअर्संना काय दिला सल्ला?

गर्भपातावर पोप यांनी हे सांगितले

गर्भपाताबाबत पोप फ्रान्सिस म्हणाले की, धर्मगुरूंनी गर्भपात करणाऱ्या महिलांशी दयाळूपणे वागले पाहिजे. मात्र, गर्भपाताची प्रथा मान्य करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोप म्हणाले, ‘एखाद्या महिलेचा गर्भपात झाला असेल, तर तिला पाठिंबा देणे ही एक गोष्ट आहे आणि गर्भपाताचे समर्थन करणे ही दुसरी गोष्ट आहे.’पोपच्या या टिप्पण्या व्हॅटिकन चर्चचे अधिकृत वृत्तपत्र L’Osservatore Romano ने देखील प्रकाशित केल्या आहेत. पोपच्या तरुणांशी झालेल्या या संभाषणाला वृत्तपत्राने ‘खुले आणि प्रामाणिक संभाषण’ म्हटले आहे.

सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर या डॉक्युमेंट्रीची खूप चर्चा होत असून यूजर्स पोपच्या कमेंटचे कौतुक करत आहेत. एका महिला युजरने ट्विटरवर लिहिले की, ‘मी खरे सांगत आहे, मला विश्वास बसत नाही की एखादा पोप असे बोलू शकतो.’ पोपची स्तुती करताना आणखी एका युजरने मजेशीर स्वरात लिहिले, ‘ते खरोखरच पोप होते… की एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) मधून बनवलेला त्याचा फॉर्म होता?’

Wife swapping : प्रमोशनसाठी पत्नीला सांगायचा बॉससोबत सेक्स करायला

हे वाचलं का?

    follow whatsapp