राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा, वीजदरांत दोन टक्क्यांची कपात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पेट्रोल आणि डिझेलचे वाढणारे भाव आणि त्यामुळे जिवनावश्यक वस्तूंसाठी मोजावे लागणारे जास्त पैसे यामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेला सरकारने काहीसा दिलासा दिलासा दिला आहे. १ एप्रिल २०२१ पासून वीज दरात २ टक्क्यांनी कपात करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. पुढील ५ वर्षांकरता हे दर लागू असणार आहेत, ज्यामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे.

इंधन समायोजन कर म्हणजेच FAC फंडाचा वापर करुन वीज कंपन्यांनी ग्राहकांना फायदा देण्याचे आदेश वीज नियामक आयोगाने दिले आहेत. या आदेशानुसार महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांच्या वीजदरात दोन टक्क्यांनी कपात केली जाणार आहे. १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू होतील.

वीज नियामक आयोगाने जाहीर केलेल्या दरांनुसार पुढील पाच वर्षांसाठी महावितरणच्या घरगुती वीजबिलात १ टक्क्याची कपात होईल. त्यामुळे प्रत्येक युनिटमागे ग्राहकांना अंदाजे ७ ते ८ रुपये मोजावे लागणार आहेत. अदानी कंपनीच्या वीज ग्राहकांसाठी ही कपात ०.३ टक्के इतकी असून या ग्राहकांना अंदाजे एका युनिटमागे ६ ते ७ रुपये मोजावे लागतील. बेस्टच्या ग्राहकांसाठी ०.१ टक्के कपात करण्यात आलेली असून प्रति युनिटमागे ग्राहकांना ६ ते ७ रुपये मोजावे लागणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT