नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी; सचिन सावंतांनी दिला राजीनामा - Mumbai Tak - sachin sawant resigned as congress maharashtra state spokesperson wrote letter to high command - MumbaiTAK
बातम्या

नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी; सचिन सावंतांनी दिला राजीनामा

दहा वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र काँग्रेसचं प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत असलेल्या नाराजीतून हा राजीनामा सचिन सावंत यांनी दिला आहे अशीही चर्चा रंगली आहे. सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षांपासून जास्त काळ प्रवक्ते होते. तरीही […]

दहा वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र काँग्रेसचं प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत असलेल्या नाराजीतून हा राजीनामा सचिन सावंत यांनी दिला आहे अशीही चर्चा रंगली आहे. सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षांपासून जास्त काळ प्रवक्ते होते. तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या ट्विटर पेजवरूनही त्यांनी प्रवक्ता असल्याचं हटवलं आहे. सचिन सावंत हे नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचीही चर्चा आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आत्तापर्यंत अनेकदा काँग्रेसची बाजू आपल्या परिने लावून धरली आहे. टीव्ही शो असतील किंवा आंदोलनं असतील त्या सगळ्या ठिकाणी सचिन सावंत यांनी काँग्रेसची बाजू उचलून धरली होती. एक उत्तम प्रवक्ते म्हणून सचिन सावंत यांची ओळख होती. मात्र त्यांनी आज आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. सचिन सावंत हे एक प्रभावी प्रवक्ते म्हणून ओळखले जात. त्यांचे ट्विटही चांगलेच सूचक आणि विरोधी पक्षाला तिखट वाटतील असेच असायचे. आता याच सचिन सावंत यांनी राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना जबाबदा-यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी माजी मंत्री सुनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे.

सोशल मीडिया विभागाची जबाबदारी विशाल मुत्तेमवार यांच्याकडे व निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी रमेश शेट्टी यांची व प्रशिक्षण विभागाची जबाबदारी माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्याकडे देण्यात आली आहे. जी यादी आज जाहीर करण्यात आली आहे त्या यादीत सचिन सावंत याचं नाव कुठेच नाही त्यामुळे सचिन सावंत नाराजी व्यक्त करत आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

नाना पटोले यांची नियुक्ती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी झाल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रात आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. नाना पटोले यांनी स्वबळावर सत्तेत येण्याचंही भाष्य अनेकदा केलं आहे. अशात त्यांनी आज आपली टीम जाहीर केली त्यात सचिन सावंत यांचं नाव नव्हतं. त्यामुळेच सचिन सावंत यांनी नाराज होऊन आपलं पद सोडल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − eight =

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!