आजपासून संसेदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. यानंतर दुसऱ्या टप्प्यात विरोधीपक्ष गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरुन सरकारला घेरण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुन काँग्रेस लोकसभा आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी वाढ आणि यामुळे सामान्य माणसांना होणारा त्रास यावरुन काँग्रेसने आतापर्यंत नरेंद्र मोदी सरकारवर वारंवार टीका केली आहे. ज्याप्रमाणे विरोधीपक्ष गेल्या काही दिवसांत रस्त्यावर सरकारला घेरण्यात यशस्वी ठरला…त्यात पद्धतीने विरोधीपक्ष सरकारला संसदेत कोंडीत पकडण्याची पुरेपूर तयारी करण्याची शक्यता आहे.
संसदेत सभागृहात कोणत्याही महत्वाच्या विषयावर सरकारचं लक्ष केंद्रीत करण्यासाठी सदस्य स्थगन प्रस्ताव आणू शकतो. अध्यक्ष किंवा सभापतींनी हा प्रस्ताव मान्य केल्यास…दिवसभराचं सर्व कामकाज थांबवून त्या विषयावर चर्चा केली जाते. त्यामुळे आजपासून विरोधकांच्या रणनितीला मोदी सरकार कशा पद्धतीने उत्तर देणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे.
‘मी कोब्रा आहे, दंशही पुरेसा’, मिथुनदाचा भाजपच्या मंचावरुन डायलॉग