धुळे : शिरपूर तालुक्यात १२ मोरांच्या मृत्यूमुळे खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात १२ मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरपूर तालुक्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मोरांचा मृत्यू झाल्यामुळे वन विभागातही खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

जैतपूर गावात बागायती शेती केली जाते. या भागात बारमाही पिकं घेतली जात असल्यामुळे अन्नधान्य आणि पाण्याचाही मुबलक पुरवठा आहे. म्हणूनच या भागात मोरांचं प्रमाण आढळून येतं. मोरांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरीही कापूस लागवडीवेळी शेतकरी बियाणांना विषारी औषध लावतात. हेच बियाणं मोरांनी उकरुन खाल्ल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जैतपूर परिसरात सकाळी नागरिकांना मोराचे मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी वन विभागाला याबद्दल माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही मोरांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. प्राथमिक तपासणी केली असतान मोरांना अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT