युद्धभूमीतला संघर्ष जेव्हा आईच्या मिठीत संपतो
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी परत आणण्याचं काम सध्या केंद्र सरकार करत आहे. ऑपरेशन गंगा च्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या देशांमध्ये रस्ते मार्गाने आणत नंतर विमानाने मुंबईत आणलं जात आहे. १८२ विद्यार्थ्यांना घेऊन येणारं विमान नुकतच मुंबई विमानतळावर दाखल झालं. रशियाने केलेलं आक्रमण, सतत युद्धाच्या सावटाखाली आपण सापडू ही भीती, संपत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी परत आणण्याचं काम सध्या केंद्र सरकार करत आहे. ऑपरेशन गंगा च्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या देशांमध्ये रस्ते मार्गाने आणत नंतर विमानाने मुंबईत आणलं जात आहे.
हे वाचलं का?
१८२ विद्यार्थ्यांना घेऊन येणारं विमान नुकतच मुंबई विमानतळावर दाखल झालं. रशियाने केलेलं आक्रमण, सतत युद्धाच्या सावटाखाली आपण सापडू ही भीती, संपत चाललेल्या जीवनावश्यक वस्तू या सर्व अग्नीदिव्यातून ही मुलं भारतात परत आली. मुंबईत दाखल होताच आईच्या मिठीत हा संपूर्ण संघर्ष एका झटक्यात गळून पडला.
ADVERTISEMENT
आपल्या मुलाला पाहिल्यानंतर पालक आणि त्यांच्या नातेवाईंची परिस्थिती अक्षरशः जीव भांड्यात पडल्यागत झाली.
ADVERTISEMENT
मुलगी सुखरुप भारतात परत आल्यानंतर आईच्या डोळ्यात आलेले अश्रु….मुंबई विमानतळावर सध्या युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या विविध भावनांचं दर्शन होत आहे.
युद्धभूमीत याच तिरंग्याने अनेक भारतीय विद्यार्थ्यांचं रक्षण केलं.
वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या या विद्यार्थ्यांनी केल्या काही दिवसांमध्ये खूप काही भोगलं आहे. परंतू या अग्नीदिव्यातून ही मुलं आता परत आल्यानंतर त्यांना धीर देताना पालक…पाहूयात यावेळची काही खास क्षणचित्र…
देशाच्या रक्षणासाठी काहीही…वाचा युक्रेन-रशियातल्या युद्धसंघर्षावर विशेष वृत्त
आपलं मुल घरी आल्यानंतर कशा होत्या पालकांच्या भावना, पाहा खास फोटो
कसा आहेस रे बाळा…काही झालं तर नाही ना तुला? असंच ही आई या मुलाला विचारत असेल
एखादं मोठं संकट पार पाडल्यानंतर काहीतरी गोड खाऊन नवीन सुरुवात करायची ही आपल्या भारतीयांची जुनी सवय आहे. आपल्या मुलीला केक भरवताना तिच्या घरातले…
युक्रेनमधला संघर्ष अजुनही सुरुच…पाहा काळीज पिळवटून टाकणारे हे फोटो
युद्धभूमी बनलेल्या युक्रेनमधली आताची परिस्थिती कशी आहे? पाहा हे फोटो
अजुनही काही विद्यार्थी युक्रेनमध्येच अडकलेले…कोणत्या परिस्थितीत राहत आहेत भारतीय विद्यार्थी वाचा विशेष वृत्त
एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हासू…
युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनचे प्रयत्न, चर्चेची पहिली फेरी निष्फळ. वाचा काय घडलं चर्चेत?
युद्धपरिस्थिती आणि बाबा वेंगाची भविष्यवाणी, वाचा विशेष वृत्त
आतापर्यंत झालेल्या लष्करी कारवाईत किती जिवीतहानी झाला? जाणून घ्या…
…ज्याचा शेवट गोड तर सर्वकाही गोड. मग घरी परतण्याआधी एखादा सेल्फी तर व्हायलाच पाहिजे की नाही? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT