लातूर : दोन बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लातूर जवळली हरंगूळ गावात राहणाऱ्या दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंकज सुतार या व्यक्तीवर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीतांजली बनसोडे आणि धनश्री क्षीरसागर अशी या बहिणींची नावं आहेत.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी दोन्ही बहिणी हरवल्याची तक्रार त्यांच्या घरच्यांनी दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी दोन्ही बहिणींना पुण्यातून शोधून काढत परत त्यांच्या घरच्यांच्या हवाली केलं. परंतू शनिवारी या दोन्ही बहिणींनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. नोकरीचं अमिष दाखवून पंकज सुतार आपल्या मुलींना त्रास देत असल्याची तक्रार पालकांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

दरम्यान या प्रकरणात स्थानिक भाजप महिला कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दबाव टाकत आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर शिवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT