पहिली ते 12 वीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात, Varsha Gaikwad यांची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. जवळपास दीड वर्षांपासून सगळा देश या संकटाशी दोन हात करतो आहे. लॉकडाऊन, निर्बंध असं सगळं लागू करण्यात आलं आहे. अनेक कार्यालयांनी Work From home चा पर्याय अवलंबला. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग, सॅनेटायझरचा वापर या सगळ्या गोष्टींचं पालन केलं जातं आहे. अशात शाळा, कॉलेजेसही बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र त्याला मर्यादा आहेत. ज्या लक्षात घेऊन यंदाही गेल्यावर्षीप्रमाणेच पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

कोव्हिड – 19 च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगातील विद्यार्थ्याना संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यातदेखील ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती.

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे.

हे वाचलं का?

सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतचा 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा आणि तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत, याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT