चिंताजनक! देशात बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे २५ हजार आत्महत्या; केंद्राची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात मागील तीन वर्षाच्या काळात २५ हजारांपेक्षा अधिक भारतीयांनी बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. यात २०२० मध्ये बेरोजगारीमुळे सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

बेरोजगारीचा मुद्दा देशात ज्वलंत बनला असून, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सरकारचं याकडे लक्ष वेधलं जात आहे. एकीकडे मुद्द्याभोवती चर्चा सुरू असताना केंद्राने बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आत्महत्याची माहिती बुधवारी सभागृहात दिली.

Farmers Suicide: महाराष्ट्रात 11 महिन्यांत 2,500 शेतकऱ्यांनी कवटाळलं मृत्यूला

हे वाचलं का?

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात ही माहिती दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी असल्याचं राय यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार बेरोजगारीमुळे होत असलेल्या आत्महत्यांमध्ये मागील तीन वर्षात वाढ झाली आहे. कोरोना काळात म्हणजेच वर्ष २०२० मध्ये ३ हजार ५४८ जणांनी बेरोजगारीमुळे आयुष्य संपवलं. २०१८ मध्ये देशात २ हजार ७४१ जणांनी, तर २०१९ मध्ये २,८५१ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याचं सरकारने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Farmer Suicide: तहसील कार्यालयाच्या इमारतीत गळफास घेऊन शेतकऱ्यांची आत्महत्या, ढिम्म प्रशासनाने घेतला बळी

ADVERTISEMENT

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०१८ मध्ये ४ हजार ९७० जणांनी कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळलं. २०१९ मध्ये त्यात वाढ झाल्याचं दिसून ५ हजार ९०८ जणांनी आत्महत्या केली. २०२० मध्ये ५ हजार २१३ जणांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.

बेरोजगारीमुळे वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. रोजगाराच्या संधींबरोबरच मानसिक आरोग्यावरही लक्ष दिलं जात आहे, असं नित्यानंद राय यांनी म्हटलं आहे. ‘मानसिक आजारा दूर करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करत आहे. देशातील ६९२ जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे, असंही राय म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT