Palghar Accident: एकविरा देवीच्या दर्शनावरून परतताना कार-कंटेनरचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
मोहम्मद हुसेन खान, पालघर एकविरा मातेचं दर्शन करुन परतत असलेल्या भाविकांवर काळाने झडप घातली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोरजवळ इको कार आणि कंटनेर याच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ज्यामध्ये तीन जणांचा तर जागीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले होते. याच जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू […]
ADVERTISEMENT
मोहम्मद हुसेन खान, पालघर
ADVERTISEMENT
एकविरा मातेचं दर्शन करुन परतत असलेल्या भाविकांवर काळाने झडप घातली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोरजवळ इको कार आणि कंटनेर याच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ज्यामध्ये तीन जणांचा तर जागीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले होते. याच जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचं समजतं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व जण पालघरमधील दांडी येथील रहिवासी आहेत. रविवारी लोणावळ्याजवळील एकविरा देवीचं दर्शन घेऊन हे सगळे भाविक घरी परतत असताना कार आणि कंटेनरची जोरदार धडक झाली ज्यामध्ये हेमंत तरे, राकेश तामोरे, सुषमा आरेकर या तिघांचा मृत्यू झाला.
हे वाचलं का?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार संध्याकाळी साडे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मानेरजवळील आवंढाणी गावाच्या नजीक इको कारने प्रचंड वेगाने थेट कंटेनरलाच धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, ज्यामध्ये संपूर्ण इको कारचा अक्षरश: चुरडा झाला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर स्थानिक नागरिकांनी देखील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचाारासाठी दाखल केलं. मात्र, हा अपघात एवढा भीषण होता की, इको कारमधील अनेक जण हे अद्यापही या धक्क्यातून सावरु शकलेले नाहीत.
ADVERTISEMENT
लातूर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात, सहा जण गंभीर जखमी
ADVERTISEMENT
मुंबई-अहमदाबाद हायवेवर आतापर्यंत अनेकदा भीषण अपघात झाले आहेत. त्यामुळे आता या अपघातांवर नियंत्रण आणण्याासाठी काही योग्य आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं. कारण दिवसेंदिवस येथील अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्यामुळे जीवितहानी देखील होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT