हिंगोली : रस्त्यातील खड्ड्यात कार पलटी होऊन चौघांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव नजिक राष्ट्रीय महामार्गावर कार कोसळल्यामुळे पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून चारही मृत व्यक्ती पेशाने शिक्षक होते. अंकुश गायकवाड, त्र्यंबक थोरवे, गजानन सानप, विजय ठाकरे अशी या शिक्षकांची नावं असून ते बुलडाणा जिल्ह्यातले होते.

ADVERTISEMENT

राष्ट्रीय महामार्गावर सेनगावपासून काही अंतरावर पुलाचं काम सुरु आहे. या बांधकामादरम्यान एक मोठा खड्डा पडला आहे. पावसाचा अंदाज न आल्यामुळे रात्री प्रवासादरम्यान ही गाडी खड्ड्यात पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. गाडी खड्ड्यात कोसळल्यानंतर ती पूर्णपणे लॉक झाल्यामुळे चारही जणं आतच अडकले गेले. यातच चारही शिक्षकांचा गुदमरुन मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढले. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे रात्री वाहनचालकांना या कामाची माहिती मिळत नाही आणि खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे असे अपघात होतात अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT