आजपासून कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा, ४५ वर्षांवरील व्यक्तींना मिळणार लस

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजापासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली केली. आजपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींनाच लस मिळत होती. परंतू चौथ्या टप्प्यापासून आता ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस मिळणार आहे.

ADVERTISEMENT

चौथ्या टप्प्यात ज्यांना लस घ्यायची आहे त्यांनी कोविन या App वर जाऊन स्वतःचं नाव रजिस्टर करायचं आहे. याव्यतिरीक्त आरोग्य सेतू App द्वारेही आपण आपलं नाव रजिस्टर करु शकणार आहोत. ज्या व्यक्तींना आपलं नाव ऑनलाईन रजिस्टर करता येत नसेल त्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन जवळील लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी अशीही सोय करण्यात आली आहे. सरकारी रुग्णालयात कोरोनाची लस मोफत दिली जाणार असून खासगी हॉस्पिटलमध्ये लसीसाठी २५० रुपयांचा दर आकारला जाणार आहे. ज्यातील १५० रुपये हे लसीचे तर १०० रुपये हे सर्विस प्रोव्हाईडरचे असणार आहेत. लस दिल्यानंतर तुमच्यावर कोणतेही दुष्परिणाम तर होत नाहीयेत ना हे पाहण्यासाठी अर्धा तास तुमच्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे.

लसीकरणाच्या ७५ व्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत १३.४ लाख जणांना लस दिली गेली. आतापर्यंत देशात ६.४३ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. एकीकडे देशात महाराष्ट्रासह सर्व महत्वाच्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सध्या लसीकरणात आघाडीवर असून सर्वात जास्त रुग्ण देखील महाराष्ट्रातच सापडत आहेत. महाराष्ट्राव्यतिरीक्त छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमध्येही नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात Corona रुग्णसंख्येचा आलेख वाढताच, ३९ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात ३१ मार्चला ३९ हजार ५४४ नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले तर २२७ जणांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये ३१ मार्चला सकाळच्या सत्रापर्यंत कोरोनाचे ५ हजार ५७ नवे रुग्ण सापडले, ज्यात १२४ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात बुधवारी १ हजार २३० नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT