लोणावळा : कार-कंटेनरचा भीषण अपघात, ५ जणांचा जागेवरच मृत्यू
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मावळ तालुक्यातील शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. कार्ला फाटा सोडल्यानंतर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे दुभाजक […]
ADVERTISEMENT
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मावळ तालुक्यातील शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. कार्ला फाटा सोडल्यानंतर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे दुभाजक ओलांडून ही कार मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरच्या मार्गात आली. यावेळी कंटेनरच्या धडकेमुळे या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, ज्यात पाचही जणांना आपले प्राण गमवावे लागले.
अपघाताची माहिती समजताच, आयरबीची पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT