भरधाव कार ट्रेलरवर आदळली; पती-पत्नीसह पाच महिन्याच्या मुलाचा मृत्यू
नागपूरच्या तागडे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नागपूर-अमरावती महामार्गावर ट्रेलरसोबत झालेल्या धडकेत पती-पत्नीसह पाच महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला असून ८ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोशन तागडे हे कोंढाळी येथे लग्नसोहळ्यासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटपून नागपूरकडे शनिवारी परतत असताना हा अपघात घडला आहे. तागडे कुटुंब नागपूरला परतत असताना लोखंडी कॉईल घेऊन […]
ADVERTISEMENT
नागपूरच्या तागडे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नागपूर-अमरावती महामार्गावर ट्रेलरसोबत झालेल्या धडकेत पती-पत्नीसह पाच महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला असून ८ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोशन तागडे हे कोंढाळी येथे लग्नसोहळ्यासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटपून नागपूरकडे शनिवारी परतत असताना हा अपघात घडला आहे.
ADVERTISEMENT
तागडे कुटुंब नागपूरला परतत असताना लोखंडी कॉईल घेऊन एक ट्रक पुण्यावरुन कळमेश्वरकडे येत होता. यावेळी ट्रेलकच्या चालकाने अचानक ट्रेलर थांबवण्यासाठी डावीकडे वळवला असता पाठीमागून येणाऱ्या तागडे यांची कार ट्रेलरला जाऊन आदळली. हा अपघात इतका तीव्र होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
डिजीटल करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणुक; मोस्ट वाँटेड निषीद वासनिक अटकेत
हे वाचलं का?
या अपघातात कार चालवणारे रोशन तागडे आणि त्यांचा पाच महिन्यांचा मुलगा राम हे जागीच ठार झाले. रोशन यांची पत्नी आचल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचा मृत्यू झाला. तागडे यांची ८ वर्षांची मुलगी जोया या अपघातात जखमी झाली असून आपला परिवार गमावल्यामुळे ती अनाथ झाली असून तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान कोंढाळी पोलिसांनी या घटनेनंतर घटनास्थळी पोहचत ट्रेलरच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वरील अपघाताची अंगारवर शहारे आणणारी दृश्ये
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT