उप-राजधानीला कोरोनाचा विळखा, रविवारी ५८ जणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपुरात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती काही केल्या आटोक्यात येण्याचं चिन्ह दिसत नाहीये. आज जिल्ह्यात ३ हजार ९७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. याचसोबत आजही ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. शनिवारी शहरात ५४ रुग्णांनी प्राण गमावले होते. त्यानंतर आज मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान प्रत्येक दिवशी वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूरच्या विभागीय कार्यालयात आढावा बैठक घेऊन प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना अमलात आणण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत सध्या तामिळनाडूत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, यासाठी अनिल देशमुखांनी आढावा बैठक घेतली.

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र दिसत आहे. रविवारी झालेल्या टास्ट फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन सारखे कडक निर्बंध लागू करण्याचे तयारी करा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व इतर अधिकारी हजर होते. या बैठकीत लॉकडाऊनसारख्या कडक निर्बंधांचं पालन होत नसेल तर लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवण्याबद्दल चर्चा झाली.

हे वाचलं का?

केवळ मुंबई, पुणे नाही तर उर्वरित ठिकाणीही सुविधा हवी

लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही अशी भीती आहे, ती त्वरित काढणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT