पिंपरी चिंचवडमध्ये रेमडेसीवीर औषधांचा काळाबाजार करणाऱ्या महिलेसोबत 2 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
राज्यात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनलीये. दररोज रूग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. शिवाय बेड्स, ऑक्सिजन तसंच रेमडेसीवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवतोय. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची घटना समोर आलीये. पिंपरी चिंचवडमध्ये एका रूग्णालयात काम करणाऱ्या नर्सकडून रेमडेसीवीर इंजेक्शनचं काळाबाजार करत होती. यासंदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस कमिश्नर कृष्ण प्रकाश यांना एक महिला अवैध पद्धतीने […]
ADVERTISEMENT
राज्यात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनलीये. दररोज रूग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. शिवाय बेड्स, ऑक्सिजन तसंच रेमडेसीवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवतोय. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची घटना समोर आलीये.
ADVERTISEMENT
पिंपरी चिंचवडमध्ये एका रूग्णालयात काम करणाऱ्या नर्सकडून रेमडेसीवीर इंजेक्शनचं काळाबाजार करत होती. यासंदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस कमिश्नर कृष्ण प्रकाश यांना एक महिला अवैध पद्धतीने रेमडेसीवीर औषध विकणार असल्यासंदर्भात माहिती मिळाली. पोलिसांनी या घटनेची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला दिली.
खरं आणि बनावट रेमडेसिवीर कसं ओळखाल? ‘या’ टिप्स नक्की उपयोगात येतील!
हे वाचलं का?
या महिलेला डाव उद्धवस्त करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक बनून या महिलेला फोन केला. तिच्याशी संपर्क केला असता तिने इंजेक्शन 40 हजार रूपयांना देणार असल्याचं सांगितलं. यावेळी तिने बँकेत काही पैसे जमा करण्यास देखील सांगितलं. यानंतर संबंधित महिलेला खात्री पटली की ग्राहकाला इंजेक्शनची गरज आहे. तातडीने महिलेने ही इंजेक्शनं तिचे मित्रं राहुल बोहल आणि विजय शिरसाट यांच्या हातून ग्राहकाला पाठवले. यावेळी पोलिसांनी त्यांची ओळख पटताच त्यांना ताब्यात घेतलं.
यानंतर पोलीस चौकशीनंतर राहुल आणि विजय यांनी सांगितलं की, “पिंपरी परिसरातील आयुष नावाच्या हॉस्पिटलमध्ये ज्योती कोकणे नावाची महिला नर्स म्हणून काम करते. आणि तिनेच ही रेमडेसीवीर इंजेक्शनं दिली होती.” या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी नर्स म्हणून काम करणाऱ्या ज्योती कोकणे तसंच राहुल आणि विजय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राहुल आणि विजय यांना अटक करण्यात आली आहे. तर ज्योती कोरोना कोरोना पॉझिटिव्ह असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतेय.
ADVERTISEMENT
मुंबईत 18 ते 44 वर्षे या वयोगटाला Free Vaccine नाही, जाणून घ्या कारण
ADVERTISEMENT
पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी सांगितलं, कोरोना महामारीमध्ये अशी बेकायदेशीर कामं करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. आतापर्यंत ज्योतीने कोणत्या लोकांना इंजेक्शन अवैध पद्धतीने विकली आहेत हे पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT