instagram friend : इन्स्टावर बनला मित्र, मुलीवर बलात्कार करून आईलाच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Raped Incident : आजकाल सोशल मीडियावर मैत्री सामान्य (Social Media Friendship) झाली आहे आणि याद्वारे अनेक वेळा लोक प्रेमात पडतात (Fall In love and getting Marriage) आणि लग्न करतात. पण कधी कधी या प्रकारची ऑनलाइन मैत्री खूप धोकादायक ठरते. अशा मैत्रीत अनेक वेळा फसवणुकीच्या बातम्या येतात तर अनेक वेळा खून, बलात्काराच्या बातम्या (Murder and Rape incident)समोर येतात. अलीकडचे प्रकरणही असेच आहे. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये 11 वीच्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या इन्स्टाग्रामवरील मित्राने (Instagram Friend) बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. प्रकरण तेंव्हा समोर आले जेंव्हा आरोपीने मुलीचे नग्न फोटो तिच्या आईला पाठवले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. raped the girl and sent naked photos to her mother

पालघरमध्ये खळबळ! 16 वर्षाच्या मुलीवर 8 नराधमांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या मुलीची गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती आणि मैत्रीदरम्यान तिने न्यूड व्हिडिओ कॉलही केला होता. आईने पोलिसांना सांगितले की, आरोपीने तिच्या मुलीला गुरुग्राममधील हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पीडितेच्या आईने सांगितले की, “गेल्या आठवड्यात त्याने तिला पुन्हा दोनदा हॉटेलमध्ये बोलावले. तो माझ्या मुलीला तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो ऑनलाइन शेअर करण्याची धमकी देऊन त्याला भेटण्यासाठी दबाव आणत होता.” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, “मंगळवारी त्याने सोशल मीडियावर माझ्या मुलीचे अश्लील छायाचित्र पोस्ट केले आणि ते मलाही पाठवले. मी माझ्या मुलीला विचारले असता, तिने मला संपूर्ण घटना सांगितली.”

Crime : ‘बेस्ट फ्रेंडनेच’ केला विश्वासघात! मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ADVERTISEMENT

तक्रारीनंतर, पीडितेच्या आईने आरोपी राज द्विवेदी विरुद्ध महिला पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याच्या कलम 8 (लैंगिक छळ) आणि 12 (लैंगिक छळ), आयपीसी कलम 506 (गुन्हेगारी धमकी) आणि कलम 67 अ अंतर्गत आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलीस स्टेशन (पश्चिम) च्या एसएचओ इन्स्पेक्टर पूनम सिंग यांनी सांगितले की, “एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि आम्ही आरोपीला पकडण्यासाठी छापे टाकत आहोत. तो विद्यार्थी असल्याचेही सांगितले जात आहे.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT