नांदेडच्या धर्माबाद रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या महिलेचे दागिने लुटले, दोघांनी केला बलात्कार
नांदेडमधल्या धर्माबाद स्टेशन एका महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धर्माबाद या रेल्वे स्टेशनवर एक महिला एकटी थांबली होती. हे पाहून दोघांनी तिला गोड गोड बोलून जाळ्यात ओढलं. त्यानंतर निर्जन स्थळी घेऊन गेले. निर्जन स्थळी जाताच तिच्या अंगावर असलेले 75 हजारांचे दागिने या दोघांनी हिसकावले. त्यानंतर या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. मुंबई : […]
ADVERTISEMENT
नांदेडमधल्या धर्माबाद स्टेशन एका महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धर्माबाद या रेल्वे स्टेशनवर एक महिला एकटी थांबली होती. हे पाहून दोघांनी तिला गोड गोड बोलून जाळ्यात ओढलं. त्यानंतर निर्जन स्थळी घेऊन गेले. निर्जन स्थळी जाताच तिच्या अंगावर असलेले 75 हजारांचे दागिने या दोघांनी हिसकावले. त्यानंतर या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला.
ADVERTISEMENT
मुंबई : बोलायचं आहे म्हणून नेलं अन् चौघांनी केला सामूहिक बलात्कार; गोवंडीतील धक्कादायक घटना
या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन आरोपीना अटक केलीय. धर्माबाद रेल्वे स्टेशनच्या जवळच घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. रेल्वे पोलिसांनी यातील दोन्ही आरोपीना अटक करत अधिकचा तपास सुरू करण्यात आलाय. अशी माहिती रेलवे चे DYSP मनोज पगारे दिली.
हे वाचलं का?
Pune Crime : शिरुर हादरलं ! विधवा महिलेवर सामुहिक बलात्कार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
आणखी काय म्हटलं आहे पोलिसांनी?
ADVERTISEMENT
‘नांदेडच्या धर्माबाद रेल्वे स्टेशनवर एका महिलेवर दोघांनी बलात्कार केला. त्याप्रकरणी कलम 325, 375, 396 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या आरोपींनी अत्याचार केला त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू आहे. हे आरोपी रात्री उशिरा आलेल्या पॅसेंजरमधून आले होते. त्याचवेळी ही घटना घडली आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून आम्ही या प्रकरणी पुढील तपास करतो आहोत’ असंही मनोज पगारे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
मुंबईतही एका वीस वर्षांच्या तरूणीवर कामावरून परतत असताना सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आता त्यापाठोपाठ नांदेडमधल्या धर्माबाद या ठिकाणीही अशीच घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT