PUNE: कोयता खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक, पुणे पोलिसांची अनोखी शक्कल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Aadhaar Card mandatory for buying Koyta in Pune: पुणे: पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने (Koyta Gang) दहशत पसरवली असून पुणे पोलिसांकडून (Pune Police) कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. चिंताजनक बाब म्हणजे या कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याचं दिसून येतं आहे. कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आता पुणे पोलिसांनी नवीन शक्कल लढवली आहे. आत्ता यापुढे शहरात कुठेही कोयता खरेदी करायचा असल्यास त्या संबंधित व्यक्तीला आधारकार्ड (Aadhaar Card) द्यावं लागणार असल्याचं माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. (aadhaar card mandatory for buying sickle a unique trick of pune police)

ADVERTISEMENT

शहरात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घटनांमध्ये कोयताच्या वापर दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सध्या शहरात जी पण कोयत्याची दुकाने आहे. त्या दुकानावर कोयता विक्री करण्यापूर्वी ज्याला कोयता घ्यायचा आहे त्या व्यक्तीला आपलं आधारकार्ड द्यावं लागणार आहे. यामुळे कोयता कोणी विकत घेतला याची माहिती पोलिसांना असणार आहे. कारण मोठ्या प्रमाणावर शहरात होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा वापर दिसून येत आहे. म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

अजित पवारांनी मुद्दा मांडताच पोलीस ॲक्शनमध्ये; 12 तासांत कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या

हे वाचलं का?

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. यावर कडक पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. यात अनेक गुन्हेगारांवर कारवाई देखील करण्यात आली. आत्ता पुढचं पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि प्रत्येक कोयता विक्री-खरेदी करणाऱ्याला आधार कार्ड द्यावं लागणार आहे.

– आरोपी पकडा अन् बक्षिस मिळवा

दुसरीकडे पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसात कोयता गँगने धूमाकुळ घातला असून फायरींगच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शहरात गुंडाचा वाढता धुमाकूळ पाहता पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले असून या गुंडाना पकडणार्‍या पोलिसांवर आता बक्षीसांची खैरात करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

– यानुसार पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील हजारो रुपयांची बक्षीसे देण्यात येणार असून पुणे पोलिसांची ही बक्षीस योजनेवर बरीच टीकाही करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी साताऱ्याजवळ अटक; काय आहे प्रकरण?

– पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे.

– कोयता गँग, वाढती गुन्हेगारी थांबवण्याच्या या पार्श्वभूमीवर आता सराईतांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. पण त्यासाठी बक्षीस जाहीर करुन कर्मचार्‍यांवर हजारो रुपयांची खैरात का केली जाणार? असा सवाल विचारण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT