मुंब्रा खाडीत कसा फेकला मनसुखचा मृतदेह? ATS च्या अटकेत असलेल्या आरोपीने दिली माहिती
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात महाराष्ट्र ATS च्या पथकाने दोघांना अटक केली आहे. नरेश गोर आणि विनायक शिंदे अशी या आरोपींची नाव असून या दोन्ही आरोपींची कस्टडी ३० मार्चपर्यंत ATS कडे देण्यात आली आहे. यातील विनायक शिंदे हे मुंबई पोलीस दलातील माजी कर्मचारी असून ते लखन भय्या एन्काऊंटर प्रकरणात पॅरोलवर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ATS च्या […]
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात महाराष्ट्र ATS च्या पथकाने दोघांना अटक केली आहे. नरेश गोर आणि विनायक शिंदे अशी या आरोपींची नाव असून या दोन्ही आरोपींची कस्टडी ३० मार्चपर्यंत ATS कडे देण्यात आली आहे. यातील विनायक शिंदे हे मुंबई पोलीस दलातील माजी कर्मचारी असून ते लखन भय्या एन्काऊंटर प्रकरणात पॅरोलवर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ATS च्या अधिकाऱ्यांनी आज आरोपी विनायक शिंदे यांना सोबत घेऊन मुंब्रा खाडीवर Spot Recreation केलं. याव्यतिरीक्त शिंदे यांच्या कळवा येथील घरातही ATS चे अधिकारी गेले होते.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान आरोपी शिंदेने ATS च्या अधिकाऱ्यांना मनसुख हिरेनची बॉडी कोणत्या ठिकाणावरुन खाली फेकली ती जागा दाखवली. यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या जागेवरही ATS चे शिंदे यांना घेऊन गेले. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओमधील धमकीच्या पत्रामध्ये शिंदे यांचा सहभाग असल्याचा ATS ला संशय आहे. शिंदे यांच्या कळवा येथील घरात एक प्रिंटर सापडला आहे. याच प्रिंटरमधून धमकीचं पत्र प्रिंट करण्यात आलं असावं असा ATS च्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
अनिल देशमुखांच्या घराचं CCTV फुटेज तपासण्याची मागणी करत परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात याचिका
हे वाचलं का?
यानंतर शिंदे यांना घेऊन ATS चे अधिकारी सचिन वाझेंचं घर असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स येथे गेले होते. ATS च्या अधिकाऱ्यांनी सोसायटीचं Visitors Record देखील चेक केलं. दरम्यान स्कॉर्पिओ प्रकरणासोबत मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासही NIA कडे सोपवण्यात आला आहे. यासंबंधातले अधिकृत आदेशही जारी करण्यात आले आहेत. NIA च्या अधिकाऱ्यांनी तपास हाती घेण्याच्या आधीच ATS चे अधिकारी या प्रकरणात वेगाने तपास करताना दिसत आहेत.
अँटेलिया प्रकरणाचे हादरे गृहमंत्र्यांपर्यंत, कसे अडकत गेले अनिल देशमुख?; पाहा सविस्तर रिपोर्ट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT