कोरोना रूग्णांसाठी अभिनेता प्रभासने दान केला आगामी सिनेमाचा संपूर्ण सेट
देशात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. अशाच परिस्थितीत रूग्णांना बेड्स, ऑक्सिजन तसंच औषधं मिळणं कठीण झालं आहे. बेड्सची कमतरता जाणवत असल्याचं लक्षात आल्यावर अभिनेता प्रभासने पुढाकार घेतला आहे. प्रभासने त्याच्या आगामी सिनेमाचा संपूर्ण सेट कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दान केलाय. लवकरच प्रभासचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधे श्याम […]
ADVERTISEMENT
देशात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. अशाच परिस्थितीत रूग्णांना बेड्स, ऑक्सिजन तसंच औषधं मिळणं कठीण झालं आहे. बेड्सची कमतरता जाणवत असल्याचं लक्षात आल्यावर अभिनेता प्रभासने पुढाकार घेतला आहे. प्रभासने त्याच्या आगामी सिनेमाचा संपूर्ण सेट कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दान केलाय.
ADVERTISEMENT
लवकरच प्रभासचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधे श्याम असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची कथा ही एक 70च्या दशकातील आहे. यासाठीच कथेच्या मागणीप्रमाणे दिग्दर्शकाने 70 च्या दशकातील एक सेट तयार केला होता. हा सेट काहीसा रूग्णालयाच्या सेटप्रमाणे तयार करण्यात आला होता.
तर आता सध्या शूटींग होत नसल्याने हा कोट्यवधींचा सेट कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दान करण्यात आलाय. अभिनेता प्रभास तसंच निर्मात्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. शिवाय याठिकाणी लागणारी औषधं, ऑक्सिजन, पीपीई किट्स यांसारख्या अनेक वस्तूंची मदत निर्माते आणि प्रभास यांच्याकडून करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
मुख्य म्हणजे शूटींग पूर्ण झाल्यानंतर हा सेट हटवला जाणार होता. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती तसंच उपचारासाठी रुग्णालयांची कमतरता दिसून येत होती. हा सेट अगदी रूग्णालयासारखा दिसत असल्याने हा सेट लगेच कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी दान करण्यात आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT