ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हाणामारी, पत्नीवर जोक केल्याने भडकलेल्या विल स्मिथने होस्टला लगावला ठोसा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऑस्कर सोहळ्यातलं विल स्मिथ आणि प्रेझेंटर क्रिस रॉक यांच्यातलं भांडण सध्या चर्चेत आहे. कारण होस्ट क्रिस रॉक जेव्हा बोलत होता तेव्हा त्याने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर एक वक्तव्य केलं. ज्यानंतर भडकलेला विल स्मिथ स्टेजवर आला त्याने क्रिस रॉकला एक जोरदार ठोसा लगावला. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

ADVERTISEMENT

क्रिस रॉक अँकरींग करत असताना त्याने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. जेडाला एका ट्रिटमेंटमुळे केस काढावे लागले. केस नसल्यामुळेच तिला चित्रपटात भूमिका मिळाली असं क्रिस म्हणाला. जेडाने Alopecia नावाच्या आजारामुळे तिचे केस काढले आहेत. आपल्या पत्नीची अशी खिल्ली उडवली गेली ते विल स्मिथला सहन झालं नाही त्यामुळे तो लगेच स्टेजवर आला आणि त्याने क्रिस रॉकला एक जोरदार ठोसा लगावला.

क्रिस रॉकही काही क्षणांसाठी स्तब्ध झाला. विल स्मिथने ठोसा मारल्यावर त्याला बजावलं की माझ्या पत्नीचं नाव परत घेऊन नकोस, त्यावर क्रिसने नाही काढणार असं म्हटलं. ऑस्कर २०२२ चा सोहळा चांगलाच रंगात असताना ही घटना घडली आहे ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे. ही घटना समोर आल्यानंतर काही वेळातच क्रिस रॉक आणि विल स्मिथ दोघंही ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले. दोघांच्या या भांडणाचीही चांगलीच चर्चा सोशल मीडिया आणि खासकरून ट्विटरवर होते आहे.

हे वाचलं का?

विल स्मिथला या वर्षी त्याचा सिनेमा किंग रिचर्ड साठी बेस्ट अॅक्टरचा ऑस्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. किंग रिचर्ड हा सिनेमा टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि वीनस विल्यम्स यांचे वडील रिचर्ड विलियम्स यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. विल स्मिथने हे पात्र साकारलं आहे त्याच्या भूमिकेचं जगभरात कौतुक झालं आहे. जेव्हा विल स्मिथ त्याचा पुरस्कार घ्यायला गेला तेव्हा क्रिस रॉकला ठोसा लगावल्याबद्दल त्याने माफीही मागितली. प्रेमात तुम्ही काहीही करू शकता. माझ्या पत्नी विरोधात केलेली टीका मला सहन झाली नाही म्हणून क्रिस रॉकला ठोसा लगावला पण मी ऑस्कर अकॅडॅमी आणि माझ्या सहकलाकारांचीही माफी मागतो असंही विल स्मिथने यावेळी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT