Mumbai Airport व्यवस्थापनाचा ताबा मिळताच अदानींकडून मुख्यालय अहमदाबादला हलवण्याचा निर्णय
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा आता अदानींकडे देण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच कंपनीचं मुख्यालय गुजरामधल्या अहमदाबादला हलवण्यात आलं आहे. ज्यामुळे विमानतळ मुंबईत तर मुख्यालय अहमदाबादमध्ये असं चित्र आता निर्माण झालं आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे आर. के. जैन यांना सीईओ एअरपोर्ट अशी जबाबदारी दिली आहे. जैन सुरूवातीपासूनच कंपनीसोबत काम करत […]
ADVERTISEMENT
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा आता अदानींकडे देण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच कंपनीचं मुख्यालय गुजरामधल्या अहमदाबादला हलवण्यात आलं आहे. ज्यामुळे विमानतळ मुंबईत तर मुख्यालय अहमदाबादमध्ये असं चित्र आता निर्माण झालं आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे आर. के. जैन यांना सीईओ एअरपोर्ट अशी जबाबदारी दिली आहे. जैन सुरूवातीपासूनच कंपनीसोबत काम करत होते. त्यासोबतच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा ताबा मिळवण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
ADVERTISEMENT
अदानी ग्रुपकडे गुवाहाटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरू, जयपूर, तिरूअनंतपुरम विमानतळ व्यवस्थापन ताबा आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरूअनंतपुरम त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्कही अदानी समूहाला देण्यात आले आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आता जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाने घेतला आहे. याबाबतचं निवेदन कंपनीने प्रसिद्ध केलं आहे. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदिल दिला होता. इतर खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणं बाकी होतं. आता त्याला मंजुरी मिळाल्याने व्यवस्थापनाचा ताबा घेण्यात आला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपसोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे 50.5 टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचं निश्चित झालं होतं. त्याप्रमाणे कंपनीने मुंबई विमानतळामध्ये वाटा असणाऱ्या दोन दक्षिण अफ्रिकन कंपन्यांशी करार करून त्यांच्याकडी 23.5 टक्के आपल्या नावावार करण्याचा करार केला होता. 13 जुलैला अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. त्यानंतर आता मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे वाचलं का?
विमानतळ पर्यावरणस्नेही करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात संबंधित व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करू. यामध्ये मनोरंजन, ई-कॉमर्स यासारख्या संकल्पनांचा समावेश आहे. असं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT