Sanjay Raut: ‘काय कराल, तुरुंगात टाकाल ना…,’ सरनाईकांच्या पत्रानंतर राऊतांनी भाजपला दिलं आव्हान
मुंबई: ‘आम्हाला सगळं माहिती आहे. फार तर फार काय कराल तुरुंगात टाकलं ना..तुरुंगात जायची तयारी आहे आमची.’ अशी प्रतिक्रिया देत शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पाहा प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बबाबत नेमकं काय म्हणाले संजय राऊत […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘आम्हाला सगळं माहिती आहे. फार तर फार काय कराल तुरुंगात टाकलं ना..तुरुंगात जायची तयारी आहे आमची.’ अशी प्रतिक्रिया देत शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
पाहा प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बबाबत नेमकं काय म्हणाले संजय राऊत
‘प्रताप सरनाईक यांनी पत्र का लिहिलं त्याबाबत आमदारच सांगू शकतात. ते त्रासात आहेत, अडचणीत आहेत आणि त्यांच्या अडचणींचे कारण त्यांनी त्यांच्या पत्रात स्पष्ट केलं आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास देत आहे. असं पत्रमध्ये स्पष्ट म्हटलं आहे.’
‘या त्रासातून सुटका म्हणून आपण मोदींशी जुळून घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. हे त्यांचं मत झालं. मात्र, पक्षाची भूमिका हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करून ठरवली आहे आणि तेच निर्णय घेण्याचे अधिकारी आहेत.’