पंढरपूरची पोटनिवडणूक आली अंगलट, 27 पटीने वाढले कोरोना रुग्ण!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नितीन शिंदे

ADVERTISEMENT

पंढरपूर: राज्यातील कोरोना (Corona) रुग्ण वाढीमध्ये अग्रेसर असणाऱ्या 16 जिल्ह्यामध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्याचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 7 मे रात्री 8 वाजेपासून 15 मेपर्यत कडक लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर (Pandharpur by-election) सोलापूर जिल्ह्यात कोरोना विस्फोट झाल्याचं दिसून येत आहे. आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत रुग्णसंख्येमध्ये (Corona patients) तब्बल 27 पटीने वाढ झाली आहे.

खरं तर निवडणुकीनंतर येथील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच आता सोलापूर जिल्ह्यात वैदकीय सेवा वगळून सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी दिले आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

पंढरपूरमध्ये 17 मार्च 2021 रोजी पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यादिवशी पंढरपूरमध्ये रुग्ण संख्या होती फक्त 160. मंगळवेढ्यात अवघे 27 रुग्ण होते. पण आज (9 मे) रोजी पंढरपूरमध्ये तब्बल 2802 तर मंगळवेढ्यात 2382 एवढी रुग्ण संख्या आहे. तर पंढरपूरमध्ये 86 तर मंगळवेढ्यात 67 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी पहिली तर 17 मार्च रोजी 1005 होती तीच आज 17830 एवढी झाली आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 1905 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

…स्वतः कोरडे पाषाण ! पंढरपुरात जयंत पाटलांच्या दौऱ्यात कोरोनाचे नियम धाब्यावर

ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर वाढवण्याची गरज:

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सुविधा अपुऱ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण हा उपचारासाठी शहरी भागाकडे येत असतात. मात्र शहरात ही रुग्ण संख्या वाढत असून बेड व वैदकीय सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे शहरी भागातील वैद्यकीय सुविधांवर पडणारा भार ही मोठा आहे. जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त कोविड हॉस्पिटलसाठी परवानगी देणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण हा शहरी भागात उपचारासाठी दाखल होण्याचे कमी होईल व वैदकीय सेवांवरचा ताण ही कमी होईल.

पंढरपूरमध्ये ‘ही’ आहेत कोरोना वाढण्याची 5 कारणे

1. पाहिलं कारण: आहे पोटनिवडणुकीत अनेक सभा झाल्या आणि त्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ज्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला.

2. दुसरं कारण: निवडणूक झाल्यानंतर कडक लॉकडाऊन करणे गरजेचे असताना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यत किराणा, भाजीपाला व दूध विक्री सुरू ठेवण्यात आली होती. मात्र हीच ठिकाणे कोरोनाची सुपरस्प्रेडर ठिकाणं ठरली.

3. तिसरं कारण: कोव्हिड केअर सेंटरवर रुग्णांच्या नातेवाईकांचा काळजी न घेता वावरण्याने कोरोनाचा फैलाव वाढला. तसेच लसीकरण केंद्रावर नियोजन नसल्यामुळे होणारी प्रचंड गर्दी यामुळे देखील कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

4. चौथे कारण: सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याला मंत्रिपद नाही किंवा त्याचं वजन केंद्रात किंवा राज्यात नाही. त्यामुळे रेमडेसिवीर, ऑक्सिजन, लस यासारख्या वैदकीय सुविधा सरकारकडून मिळविण्यात अपयश आलं आहे. जिल्ह्यात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर आता प्रभावी नेतृत्व नसल्याने जिल्ह्यावर अन्याय होत आहे.

5. पाचवे कारण: तपासणी न करता आजार अंगावर काढणारे लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर सुरुच आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या

  • पंढरपूर – उपचार घेत असलेले रुग्ण 2802, मृत्यू – 330

  • दक्षिण सोलापूर – उपचार घेत असलेले रुग्ण 413, मृत्यू – 113

  • उत्तर सोलापूर- उपचार घेत असलेले रुग्ण 427, मृत्यू – 72

  • अक्कलकोट – उपचार घेत असलेले रुग्ण 505, मृत्यू – 113

  • बार्शी- उपचार घेत असलेले रुग्ण 1368, मृत्यू – 325

  • करमाळा- उपचार घेत असलेले रुग्ण 1728, मृत्यू -123

  • माढा- उपचार घेत असलेले रुग्ण 2766, मृत्यू – 213

  • माळशिरस- उपचार घेत असलेले रुग्ण 3199, मृत्यू – 241

  • मंगळवेढा- उपचार घेत असलेले रुग्ण 2382, मृत्यू – 118

  • मोहोळ- उपचार घेत असलेले रुग्ण 913, मृत्यू -183

  • सांगोला- उपचार घेत असलेले रुग्ण 1327, मृत्यू – 74

Pandharpur By-election Result:
पंढरपुरात भाजपकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’, समाधान आवताडेंचा निर्णायक विजय

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता लागू केलेला लॉकडाऊन हा आठ दिवसांपेक्षा जास्त वाढवणे व त्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यात लस व रेमडेसिवीर इंजिक्शन, ऑक्सिजन पुरवठा इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त करणे आवश्यक आहे. असं झाले तरच वाढती रुग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला यश येईल. (after the pandharpur by-election the number of corona patients has increased 27 percent)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT