Shiv Sena vs BJP: ‘सेना भवनपर्यंत तुमच्या पायावर याल, पण जाताना ‘खांद्यावर’ जाण्याची वेळ येईल’, भाजपला थेट आव्हान
मुंबई: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन तोडण्याच्या केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मात्र, आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर प्रचंड टीका करण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या याच अग्रलेखातून शिवसेनेने थेट भाजपला आव्हान दिलं आहे. ‘एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही […]
ADVERTISEMENT

मुंबई: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन तोडण्याच्या केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मात्र, आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर प्रचंड टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, आपल्या याच अग्रलेखातून शिवसेनेने थेट भाजपला आव्हान दिलं आहे. ‘एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या.’ असं आव्हान शिवसेनेने भाजपला दिली आहे.
‘सामना’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
-
मराठी माणसांच्या न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज शिवसेना! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ करत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही.









