Air India: महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला तब्बल 42 दिवसांनी अटक!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Air India: एअर इंडिया (Air India) विमानात कित्येकवेळा प्रवाशांसह गैरवर्तवणूकीचे प्रकार घडतात. पण, यावेळी जे समोर आले ते घृणास्पद होते. एका 70 वर्षीय वयोवृद्ध महिला प्रवाशाच्या अंगावर नशेत असणाऱ्या सहप्रवाशाने लघुशंका केल्याची घटना एअर इंडियाच्या विमानांमध्ये घडली. याची गंभीर दखल एअरलाईनने घेतली आहे. ही घटना 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडली. अशा परिस्थितीत, 42 दिवसानंतर या आरोपीला बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. (Air India Flight Incedent Shankar Mishra arrested In accused Of Urinated on woman)

ADVERTISEMENT

26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाचे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असताना हा प्रकार घडला. या आरोपीचे नाव शंकर मिश्रा (35) असे आहे तर, त्याला पोलिसांनी अटक करून दिल्लीला आणले आहे. आरोपी बरेच दिवस फरार होता. मिळालेल्या माहितीनुसार, शंकर मिश्रा या व्यक्तीचा मोबाइल फोन ३ जानेवारीपर्यंत बंगळुरूत अॅक्टिव्ह होता परंतु, त्यानंतर त्याचा फोन हा स्विच ऑफ दाखवण्यात आला. त्याचे शेवटचे लोकेशन हे बंगळुरू होते. या आधारे त्याचा शोध घेण्यात आला.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी केली होती. आरोपी शंकर मिश्राविरुद्ध पोलिसांनी कलम 354, 294, 509, 510 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

IND vs SL T20: ‘नो-बॉल टाकणं क्राइमच’, हार्दिक पांड्या प्रचंड भडकला

पीडित महिलेचे एअर इंडिया एअर लाइन्सवर आरोप…

ADVERTISEMENT

दिल्ली पोलिसात शंकर मिश्राविरूद्ध या महिलेने तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध दाखल केलेल्या अहवालानुसार, आरोपी शंकर मिश्राने महिलेला त्याची तक्रार करू नये अशी विनंती केली होती. त्याच्या या कृत्यामुळे पत्नी आणि मुलांना त्रास होऊ नये अशी त्याची इच्छा होती. पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला.

ADVERTISEMENT

महिलेने यानंतर एअर इंडिया कर्मचाऱ्यांवरही आरोप केले. ती म्हणाली, ‘या कृत्यानंतर मी ताबडतोब उभी राहिली आणि विमानातील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. माझे कपडे, शूज आणि बॅगेवर सर्वत्र लघुशंका केली होती. माझा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे त्या बॅगेत होते. विमानात उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सनी त्याला हात लावण्यास नकार दिला. माझी बॅग आणि शूज सॅनिटायझरने फवारले गेले आणि नंतर त्यांनी मला फ्लाइटच्या बाथरूममध्ये नेले आणि मला एअरलाइन्सचा पायजमा आणि मोजे घालायला दिले. मी त्यांना माझी सीट बदलण्यास सांगितले पण त्यांनी सांगितले की कोणतीही जागा रिकामी नाही.’

20 मिनिटे उभे राहिल्यानंतर क्रू मेंबर्सनी पीडित महिलेला जागा दिली. या सीटवर बसून महिलेने सुमारे दोन तास प्रवास केला. त्यानंतर महिलेला जागेवर जाण्यास सांगितले परंतु, तिने नकार दिला. यानंतर, पुढील प्रवासासाठी फ्लाइट क्रूमध्ये जागा देण्यात आली. अशा प्रकारच्या वर्तवणुकीमुळे महिलेने एअर इंडिया कर्मचाऱ्यांवर नाराजी व्क्त केली. यानंतर, विमानातील कर्मचाऱ्यांनी पीडित महिलेला सांगितले की, आरोपीला माफी मागायची आहे. त्यावर महिला म्हणाली, मला आरोपीशी बोलायचे नाही आणि त्याचा चेहराही पाहायचा नाही. विमानातून उतरताच आरोपीला अटक करावी, असे तिने सांगितले.

एअर इंडिया कर्मचाऱ्यांनाही पोलिसांचा समन्स!

या घटनेच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी एअर इंडिया कर्मचाऱ्यांनाही समन्स बजावले आहे. एअर इंडियाच्या वैमानिक आणि सहवैमानिकासह काही कर्मचाऱ्यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते हजर झाले नाहीत. त्यामुळे आता 7 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता विमानतळ पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात त्यांना बोलावण्यात आले आहे.

आरोपी शंकर मिश्राची नोकरीवरून हाकालपट्टी

अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनीच्या भारतीय युनिटचा उपाध्यक्ष असलेला आरोपी शंकर मिश्राला या घटनेनंतर नोकरीवरूनही काढून टाकण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT