हे छा-छू काम आहे, Pune Police मुख्यालयातील बांधकामावर Ajit Pawar नाराज
राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बिनधास्त आणि बेधडक शैलीसाठी ओळखले जातात. आतापर्यंत महाराष्ट्राने त्यांच्या या शैलीचा चांगलाच अनुभव घेतला आहे. अजितदादांच्या याच स्वभावाचा आणि शैलीचा पुणे पोलिसांना प्रत्यय पुन्हा एकदा आला. पुणे पोलीस मुख्यालयातील बांधकामाचा आढावा घेत असताना कामाच्या दर्जावरुन अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त करत…हे छा-छू चं काम असल्याचं सांगितलं. पुणे पोलीस मुख्यालयात […]
ADVERTISEMENT
राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बिनधास्त आणि बेधडक शैलीसाठी ओळखले जातात. आतापर्यंत महाराष्ट्राने त्यांच्या या शैलीचा चांगलाच अनुभव घेतला आहे. अजितदादांच्या याच स्वभावाचा आणि शैलीचा पुणे पोलिसांना प्रत्यय पुन्हा एकदा आला. पुणे पोलीस मुख्यालयातील बांधकामाचा आढावा घेत असताना कामाच्या दर्जावरुन अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त करत…हे छा-छू चं काम असल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
पुणे पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या हस्ते कोरोना काळात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला. तसंच या काळात कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनाही कोविड योद्धा पुरस्कार बहाल करण्यात आला. यानंतर पुणे पोलीस मुख्यालयातील कामांचा आढावा घेत असताना अजित पवारांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली.
“गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीसाठी बोलावलंत तर मी लई बारकाईने बघतो. चांगलं काम केलं असेल तर कौतुक करत नसेल तर ते दाखवून देतो. माझ्या भाषेत हे छा-छू चं काम आहे. या शहाण्याने पोलिसांचं काम असं केलंय तर बाकीच्यांचं काय?”, असं म्हणत अजित पवारांनी कंत्राटदाराच्या कामाबद्दल आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT