अक्षय कुमारने मानले उद्धव ठाकरेंचे आभार; चाहत्यांना म्हणाला ‘पोलीस येतायेत’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. अक्षय कुमारने त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त करत अक्षयने मुख्यमंत्र्यांचे आभार मानत त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

राज्य सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळांबरोबरच चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येत्या २२ ऑक्टोबरपासून पुन्हा मोठ्य पडद्यावर सिनेमा झळकणार असून, राज्य सरकारच्या या निर्णयाचं बॉलिवूडने स्वागत केलं आहे.

राज्य सरकारने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर रोहित शेट्टीने मुख्यमंत्र्यांसोबतचा एक फोटो ट्वीट करत निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले. त्याचबरोबर आगामी सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही घोषणा केली. दिवाळीमध्ये सूर्यवंशी रिलीज होत असल्याचं रोहित शेट्टीनं जाहीर केलं.

हे वाचलं का?

रोहित शेट्टीच्या ट्वीटनंतर अभिनेता अक्षय कुमारनेही सोशल मीडियातून या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. अक्षय कुमार सूर्यवंशी चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आहे. ‘आज असंख्य कुटुंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानत असतील. २२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहं सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल आभारी आहे. आता कुणी थांबवूनही थांबणार नाही. पोलीस येतायेत’, अशा भावना अक्षय कुमारने व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता रणवीर सिंगनेही इन्स्टाग्रामवर चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. अभिनेता अजय देवगणनेही राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. अजय देवगणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रोहित शेट्टी याचा फोटो पोस्ट केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT