Andheri East bypoll : उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला धनुष्यबाणाशिवाय लढवावी लागणार निवडणूक?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेतल्या फुटीनंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लागलीये. उद्धव ठाकरेंनी उमेदवारही जाहीर केलाय, पण एकनाथ शिंदेंच्या खेळीने आता ठाकरेंच्या उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक लढवावी लागणार अशी शक्यता निर्माण झालीये. अंधेरी पूर्व निवडणूक महिनाभरावर आलीये आणि शिंदेंनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीये. त्यामुळे अशा परिस्थिती निवडणूक आयोगाकडून ठाकरेंना तात्पुरत चिन्ह मिळेल, असं तज्ज्ञांनी म्हटलंय.

शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं जाणार!

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजाचं वार्तांकन करणारे दिल्लीतले ‘इंडिया टुडे’चे पत्रकार संजय शर्मा म्हणाले, “निवडणूक आयोगाने आज नोटीस दिलीये. ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. गेल्या काही असे अनेक प्रकरणं निवडणूक आयोगासमोर आले आहेत. अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं, तर रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी. रामविलास पासवान यांचा मुलगा आणि भाऊ यांच्यात गट पडले होते. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये दोन गट पडले होते.”

“त्या प्रकरणाकडे बघितल्यानंतर मला असं वाटतंय की उद्धव ठाकरेंकडून उत्तर आल्यानंतर निवडणूक आयोग धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवेल. कारण निवडणूक जवळ आलीये आणि इतक्या कमी कालावधी या प्रकरणात निर्णय होणं शक्य नाही.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“पुढील निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग हे धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकेल. त्यानंतर निवडणूक आयोग दोन्ही गटांना निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय विचारेल. त्यातून एक चिन्ह ठाकरे आणि शिंदेंना दिलं जाईल. जसं लोक जनशक्ती पक्षाच्या एका गटाला निवडणूक आयोगाने विमान आणि दुसऱ्या गटाला शिलाई मशीन असं निवडणूक चिन्ह दिलं होतं. तसंच या प्रकरणात होऊ शकतं. कारण निवडणूक होण्यास एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे”, असं संजय शर्मा यांनी सांगितलं.

उल्हास बापट शिवसेना निवडणूक चिन्हाबद्दल काय म्हणाले?

घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेत पुरावे तपासले जातात. यात वकिलांचाही सहभाग असतो. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे आज कागदपत्रे सादर करण्यात आली असेल, तर त्याला कमीत कमी दोन तीन महिने लागतील. याच्या आधीचे जे मुख्य निवडणूक आयुक्त होते कुरैशी त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की सहा महिने लागतील. मला असं वाटतं की वेगात काम केलं तर दोन तीन महिन्यात होईल. त्यामुळे आज यासंदर्भातला निर्णय येणं शक्य नाही.”

ADVERTISEMENT

“अशा परिस्थिती पोटनिवडणूक जाहीर झाली असेल, तर दोन्ही बाजूंच्या गटांना तात्पुरत नावं आणि चिन्ह दिलं जातं. पूर्ण निकाल लागल्यानंतर जो शिवसेना असेल, त्याला शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह मिळेल आणि दुसरा जो गट उरेल त्यांना त्यांचं नवीन चिन्ह आणि नाव शोधून काढावं लागेल. ही आताची परिस्थिती आहे”, असं उल्हास बापट म्हणाले.

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाने आता ठाकरेंना उत्तर देण्यास काही तासांचा वेळ दिलाय आणि त्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. सोमवारी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, सध्यातरी निवडणूक आयोग धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवून दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह दिली जातील अशीच स्थिती दिसतेय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT