अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या पराभवासाठी भाजपची ‘दस का दम’ रणनीती! ‘त्या’ बैठकीत काय ठरलं?
शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात अस्तित्वाचा संघर्ष सुरू झालाय. पण बंडानंतर जी पहिली लढाई होतेय, त्यात ठाकरेंचा सामना आहे, तो भाजपशी. सत्तांतराची लढाई जिंकलेल्या भाजपनं आता निवडणुकीच्या रणांगणात ठाकरेंची पाठ लावण्याची जय्यत तयारी केलीये. त्यासाठी भाजपची स्ट्रॅटेजीही फायनल झालीये, असंही आता सांगितलं जात आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपची दस का दम स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे… […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात अस्तित्वाचा संघर्ष सुरू झालाय. पण बंडानंतर जी पहिली लढाई होतेय, त्यात ठाकरेंचा सामना आहे, तो भाजपशी. सत्तांतराची लढाई जिंकलेल्या भाजपनं आता निवडणुकीच्या रणांगणात ठाकरेंची पाठ लावण्याची जय्यत तयारी केलीये. त्यासाठी भाजपची स्ट्रॅटेजीही फायनल झालीये, असंही आता सांगितलं जात आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपची दस का दम स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे… ते समजून घ्या.
शिवसेनेतल्या बंडानंतर ठाकरेंची पहिली लढाई भाजपशी आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे आणि भाजप उमेदवार आमनेसामने आलेत. शिवसेना आमदार रमेश लटकेंच्या अकाली निधनानं ही पोटनिवडणूक होतेय. उद्धव ठाकरेंनी लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना, तर भाजपने गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या मुरजी पटेलांना रिंगणात उतरवलंय.
गेल्यावेळी मुरजी पटेलांनी रमेश लटकेंना तगडी फाईट दिली होती. अपक्ष असतानाही तब्बल ४५ हजार मतं घेतली होती. मुरजी पटेलांचं स्वतःचं संघटन आहे. दुसरीकडे ऋतुजा लटकेंच्या बाजूने सहानुभुती आहे. तसंच शिंदेंच्या बंडामुळे ठाकरेंसाठीही सहानुभुतीचा फॅक्टर काम करतोय, अशा चर्चा आहेत. याच सहानुभुतीला मात देण्यासाठी भाजपनं तगडी स्ट्रॅटेजी आखलीये.
राज ठाकरेंना भाजपनं पत्र लिहायला सांगितलं?; अरविंद सावंतांचं मनसे अध्यक्षांच्या मौनावर बोट
