राज्यसभा निवडणूक होणार चुरशीची, भाजपने तिसऱ्या जागेवर दिला उमेदवार
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) घोषणेनंतर महाराष्ट्रात एक वेगळंच राजकारण पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीराजे यांची अपक्ष उमेदवारीची घोषणा ते माघार, शिवसेनेची भूमिका या सगळ्या गोष्टींमुळे राज्यसभा निवडणूक प्रचंड चर्चेत आहे. असं असताना आता भाजपने राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे भाजपने राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना संधी दिली आहे. […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) घोषणेनंतर महाराष्ट्रात एक वेगळंच राजकारण पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीराजे यांची अपक्ष उमेदवारीची घोषणा ते माघार, शिवसेनेची भूमिका या सगळ्या गोष्टींमुळे राज्यसभा निवडणूक प्रचंड चर्चेत आहे. असं असताना आता भाजपने राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे भाजपने राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना संधी दिली आहे. तर अपेक्षेप्रमाणे मंत्री पियुष गोयल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सहाव्या जागेसाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
ADVERTISEMENT
सुरुवातीपासून राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये कुठेही अनिल बोंडे यांचं नाव कुठेही चर्चेत नव्हतं. त्यामुळेच त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भाजपमधील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. याच उमेदवारीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्णय केंद्रीय पातळीवर होतात असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी का मिळाली?
हे वाचलं का?
भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांचे असे म्हणणे आहे की, विनय सहस्रबुद्धे यांच्या जागेवर ओबीसी उमेदवार पाठवण्यावर राज्यातील कोअर कमिटीचा भर होता. अनिल बोंडे हे कुणबी मराठा आहेत. पश्चिम विदर्भात ओबीसी चेहरा म्हणून परिचित आहेत. तसेच ते माजी कृषी मंत्री असून शेतकरी प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे.
प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका देखील ते प्रभावीपणे मांडत असतात. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पराभव झाला होता. पण असं असलं तरीही फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे बोंडे हे सातत्याने राज्यातील सरकारला धारेवर धरत आले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन पक्षाने त्यांचे पुनर्वसन करून त्यांना संसदेत प्रतिनिधित्व देण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसंच राज्यातील नेत्यांची देखील त्यांनाच पसंती असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
अनिल बोंडे हे 2 वेळा आमदार राहिले आहेत. याशिवाय कृषीमंत्री, पालकमंत्री सुद्धा राहिले आहेत. याशिवाय गेल्या काळात शेतकऱ्यांचे बरेच मुद्दे त्यांनी पुढे आणले. तर नुकत्याच हिंदुत्वाच्या मुद्यात देखील त्याचा सहभाग राहिला. भाजप किसन मोर्चाचं काम देखील त्यांनी केलं आहे. त्यामुळे कदाचित या सर्व कामाची दखल घेत भाजपकडून राज्यसभेकरिता अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून भाजपने राज्यसभेवर पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांचं नाव जाहीर केल्यानंतर डॉ. बोंडे यानी आपली प्रतिक्रिया देताना भाजपा नेत्यांचे आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT
‘मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती’; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभा निवडणुकीतून माघार
तिसऱ्या जागेविषयीचा सस्पेन्स संपला
भाजपने आधी दोनच उमेदवार जाहीर केले होते. खरं म्हणजे दोनच उमेदवार निवडून येतील एवढंच संख्याबळ भाजपकडे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, भाजप या निवडणुकीत तिसरा उमेदवार देऊन चुरस वाढवणार. मात्र पहिल्या यादीत तरी पक्षाने केवळ पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्याच नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप तिसरा उमेदवार देणार की नाही याबाबत सस्पेन्स वाढला होता, पण भाजपनं माझी खासदार धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT