तब्बल साडेतीन तासांच्या चौकशीनंतर परमबीर सिंग NIA कार्यालयातून बाहेर
तब्बल साडेतीन तास चाललेल्या चौकशीनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अखेरीस NIA च्या ऑफिसमधून बाहेर पडले आहेत. अँटेलियाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ आणि गाडीमालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणात NIA ने सचिन वाझेला अटक केली आहे. या प्रकरणात NIA ने आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा या दोघांनाही आज चौकशीसाठी बोलावलं […]
ADVERTISEMENT
तब्बल साडेतीन तास चाललेल्या चौकशीनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अखेरीस NIA च्या ऑफिसमधून बाहेर पडले आहेत. अँटेलियाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ आणि गाडीमालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणात NIA ने सचिन वाझेला अटक केली आहे. या प्रकरणात NIA ने आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा या दोघांनाही आज चौकशीसाठी बोलावलं होतं.
ADVERTISEMENT
सध्या होमगार्ड विभागाचे DG म्हणून कार्यरत असलेल्या परमबीर सिंग यांचीही NIA ने चौकशी करायला सुरुवात केली आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून परमबीर सिंग NIA ऑफिसमध्ये आहेत. या चौकशीत NIA चे अधिकारी परमबीस सिंग यांना त्यांचे आणि वाझेंचे असणारे संबंध, पोलीस अधिकारी म्हणून त्यांची कार्यपद्धती याबद्दल प्रश्न विचारणार अशी माहिती मिळाली होती.
दरम्यान, स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळचं वळण लागलं. राज्य सरकारने तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त यांची पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेंकडे १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला. ज्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यानंतर अनिल देशमुखांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यावेळी NIA ने माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं.
हे वाचलं का?
एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून मुंबई पोलिसांमध्ये एक काळ गाजवणारे प्रदीप शर्मा यांच्या टीममध्ये सचिन वाझे कार्यरत होते. त्यामुळे प्रदीप शर्मांकडून NIA ला नेमकी काय माहिती हवी आहे याबद्दल आता अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर आतापर्यंत NIA ने API रियाज काझी, प्रकाश होवळ, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग माणेरे यांची चौकशी केली आहे.
दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे-पाटलांकडे राज्याच्या गृहमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, सचिन वाझेंना घेऊन NIA च्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी CSMT आणि कळवा रेल्वे स्थानकात क्राईम रिक्रीएशन केलं.
ADVERTISEMENT
CSMT वर NIA ने सचिन वाझेंना घेऊन केले Crime Recreation
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT