अहमदनगर : सैन्य भरतीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला तोतयाला अटक

मुंबई तक

सैन्यामध्ये अधिकारी असल्याचं दाखवून तरुणांकडून सैन्य भरतीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एका तोतयाला अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाने अहमदनगरमध्ये ही कारवाई केल्याचं कळतंय. नवनाथ सावळेराम गुलदागड असं या आरोपीचं नाव आहे. सैन्यात दाखल होण्याची इच्छा असलेल्या तरुणांना कधी मी सुभेदार पदावर कार्यरत आहे तर कधी कॅप्टन-कर्नल म्हणून असल्याचं दाखवायचा. आपली छाप पडावी यासाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सैन्यामध्ये अधिकारी असल्याचं दाखवून तरुणांकडून सैन्य भरतीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एका तोतयाला अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाने अहमदनगरमध्ये ही कारवाई केल्याचं कळतंय. नवनाथ सावळेराम गुलदागड असं या आरोपीचं नाव आहे.

सैन्यात दाखल होण्याची इच्छा असलेल्या तरुणांना कधी मी सुभेदार पदावर कार्यरत आहे तर कधी कॅप्टन-कर्नल म्हणून असल्याचं दाखवायचा. आपली छाप पडावी यासाठी नवनाथने सोबत रिव्हॉल्वर आणि लष्करी युनिफॉर्मही बाळगला होता.

संतापजनक! शिवसेना आमदाराकडून महिलेला रस्त्यावरच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

नवनाथने याच जोरावर काही दिवसांपूर्वी इंजिनीअर मुलीशी दोन वर्षांपूर्वी लग्न केल्याचं समोर आलं आहे. परंतू गुप्तचर विभागाने अहमदनगर पोलिसांच्या मदतीने या तोतया अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. लक्ष्मीकांत दिवे यांनी या प्रकरणात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp