अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन; अक्षयची भावूक पोस्ट

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं आज निधन झालं. त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने ट्वीट करून ही माहिती दिली. अरुणा भाटिया मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. दरम्यान, प्रकृती आणखी बिघडल्यानं त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 सप्टेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं आज निधन झालं. त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने ट्वीट करून ही माहिती दिली.

अरुणा भाटिया मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. दरम्यान, प्रकृती आणखी बिघडल्यानं त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 सप्टेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आईची प्रकृती बिघडल्याने अक्षय कुमारनेही शुटिंग अर्ध्यावर सोडलं होतं.

दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अक्षय कुमारने ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली. आईच्या निधनानंतर अक्षय कुमार भावूक झाला असून, त्याने सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

‘ती माझा अविभाज्य भाग होती. आज मला असह्य वेदना होत आहेत. माझा आई श्रीमती अरुणा भाटिया यांचं आज सकाळी हे जग सोडून गेली आहे. ती दुसऱ्या जगात पुन्हा एकदा माझ्या वडिलांकडे गेली आहे. मी आणि माझं कुटुंब कठीण काळातून जात असून, आपल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती’, असं अक्षय कुमारने ट्वीट करून म्हटलं आहे.

अक्षय कुमार शुटिंग अर्ध्यावर सोडून परतला होता मुंबईत

अक्षय कुमारच्या आईची तब्येत अनेक दिवसांपासून बरी नव्हती. शुक्रवारी अरुणा भाटिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूमध्ये दाखळ करण्यात आलं होतं. प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं शुटिंग अर्ध्यावरच सोडलं.

शुटिंग थांबवून अक्षय कुमार लंडनहून मुंबईत परतला होता. अक्षय कुमार लंडनमध्ये सिंड्रेला सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता.

अक्षय कुमारने कालही एक ट्वीट केलं होतं. ज्यात म्हटलं होतं की, ‘माझ्या आईच्या आरोग्याबद्दल तुमची चिंता आणि प्रार्थना पाहून मी भारावून गेलो आहे. मी आणि माझ्या कुटुंबियांसाठी ही अत्यंत कठीण वेळ आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे खूप मदत होईल’, असं अक्षय कुमार म्हणाला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp