ड्रग्ज प्रकरणात तुरूंगात राहिलेल्या आर्यन खानला मिळणार नुकसान भरपाई?; कायदा काय सांगतो?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानच्या विरोधात पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याने आर्यन खानला क्लिन चिट देण्यात आली आहे. मात्र आर्यन खानला जेव्हा अटक करण्यात आली होती तेव्हा त्याला २० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात रहावं लागलं होतं. आर्यन खानला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एनसीबीने अटक केली होती. समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. कॉर्डिलिया क्रूझ प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

ADVERTISEMENT

एनसीबीने आता आर्यन खानला क्लिन चिट दिली आहे. आता आर्यन खानला क्लिन चिट मिळाल्यानंतर प्रश्न हा उरतो आहे की ज्यासाठी आर्यन खानला तुरुंगात २० दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवलं गेल त्याच आरोपात त्याला क्लीन चिट मिळाल्यानंतर त्याला नुकसान भरपाई मिळणार का?

मोठी बातमी! आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

हे वाचलं का?

भारतीय राज्यघटनेत अशा अनेक तरतुदी आहेत ज्यानुसार अशा पीडितांना भरपाईसाठी जाण्याची संमती देतात. चुकीच्या पद्धतीने तुरुंगवास भोगावा लागणं यासाठी कलम २१ तसंच अनुच्छेद २२ यानुसार मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. त्यामुळे अशी भरपाई मिळू शकते त्यासाठी काही तरतुदी आहेत.

युके, जर्मनी, युएस, कॅनडा तसंच न्यूझीलँड यासारख्या देशांनी चुकीच्या पद्धतीने अटक झाली तर नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भातला अधिकार नागरिकांना दिला आहे. मात्र हा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा दोषी असलेली व्यक्ती दोषी नाही हे सिद्ध होतं. दोषी व्यक्ती निर्दोष होती हे सिद्ध झाल्यास तो नुकसान भरपाई मागू शकतो असं या देशातला कायदा सांगतो.

ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणातील NCB चे दोन तपास अधिकारी निलंबित, कारण गुलदस्त्यात

ADVERTISEMENT

युकेमधला क्रिमिनल जस्टिस अॅक्ट १९८८ हे सांगतो की ज्या अंतर्गत राज्य सचिव हे विशिष्ट अटींच्या अधीन राहून तसंच अर्ज प्राप्त झाल्यानंतर चुकीने शिक्षा भोगलेल्या वक्यक्ली भरपाई देतील. उदाहरणार्थ प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे किंवा तत्सम नुकसान, गुन्ह्याचे गांभीर्य, ​​शिक्षेची तीव्रता, गुन्ह्याचा तपास आणि खटला चालवणं अशा गोष्टी त्यात असू शकतात.

जर्मनीमध्येही अशाच पद्धतीने कायदा आहे की जर चुकीच्या पद्धतीने शिक्षा झाली तर भरपाई देण्याची पद्धत आहे. चुकीच्या पद्धतीने दोषी ठऱवलं गेलं तसंच कारवास झाला असेल तर ही नुकसान भरपाई दिली जाते.

युनायटेड स्टेट्समध्ये चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवलं गेलं असेल तर फेडरल किंवा राज्याच्या कायद्यानुसार चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवलं गेलेल्यांना नुकसान भरपाईचा अधिकार आहे.न्यूझीलंडमध्ये चुकीच्या पद्धतीने शिक्षा दिली गेली किंवा तुरुंगवास भोगावा लागला तर त्या व्यक्तीला सानुग्रह अनुदान देऊन नुकसान भरपाई दिली जाते. या सगळ्या देशांप्रमाणे भारतातही नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र त्याच्या तरतुदी वेगवेगळ्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT