Maharashtra Flood: राज्यातील महापुरात आतापर्यंत तब्बल 169 जणांचा बळी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

राज्यात आलेल्या महापूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 169 जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय 1 जण बेपत्ता आहे तर 55 जण जखमी झाले आहेत. अशी माहिती राज्याचे आपत्ती आणि व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.

याशिवाय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती काय आहे याविषयी माहिती दिली आहे. जाणून घ्या वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले.

हे वाचलं का?

‘केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र नाही तर अमरावती, अकोला, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांचे नुकसान साधारण आठशे कोटी रुपये आहे. तर विद्युत विभागाचे चारशे कोटींपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.’

‘अजून सर्व ठिकाणी पंचनामे व्हायचे आहे. सर्वांना पंचनामे करायला निर्देशित केले आहे. चिपळूण, महाड, खेड, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे.’

ADVERTISEMENT

‘या सगळ्यांचा पूर्ण पंचनामा आल्याशिवाय एकूण आकडा आल्याशिवाय आपण मदतीचा निर्णय घ्यायचा नाही अशी चर्चा काल झाली आणि तातडीनं दहा हजार रुपये सोबत काही धान्य बाधित कुटुंबाना लगेच उद्यापासून मदत करणार आहे.’

ADVERTISEMENT

‘किमान साठ-सत्तर हजार तरी कुटुंबाना ही मदत केली जाईल. कुटुंब संख्या वाढू शकते. 10 हजाराची मदत बँकेमार्फत खात्यात करू. जेणेकरुन भ्रष्टाचाराला खतपाणी मिळणार नाही.’

‘महाड, चिपळूण सारख्या शहरांमध्ये तर सर्व कार्यालय ग्रामपंचायत, नगर परिषद पंचायतमध्ये पाणी गेलं आहे. सगळे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे फोटो काढा आणि फोटोलाच ग्राह्य धरून लोकांना मदत करावी. इन्शुरन्स कंपन्यांनासुद्धा आम्ही ते सांगितलं आहे.’

CM Uddhav Thackeray: भर बाजारपेठेतून मुख्यमंत्री फिरले पायी, चिपळूणकरांचा CM उद्धव ठाकरेंसमोर आक्रोश

‘पुढील आठ दिवसांमध्ये सर्व पंचनामे आणि सर्व माहिती शासनाकडे गोळा होईल. तातडीने सगळं करा आणि प्रस्ताव पाठवा म्हणून आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.’

‘मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील आपत्तीबद्दल केंद्र सरकार कडे 3 हजार 700 कोटी मागितले होते. मात्र मिळाले फक्त 700 कोटी रुपये. त्यासाठी केंद्राचे धन्यवाद. मात्र आता पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा करावा आणि गुजरातच्या धर्तीवर तातडीने मदत करावी.’

‘कोकणात आणि राज्यात इतरत्र व्यापाऱ्यांना कमी व्याजावर कर्ज द्यावे लागणार. जिल्हा व सहकारी बँका सक्षम असतील त्यांनी तो निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांना त्याबद्दल विनंती आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या बँकांची स्थिती भक्कम आहे आणि अशा स्थितीमध्ये व्यापाऱ्यांना एक-दोन टक्के दराने कर्ज द्यावं.’

‘कोकणापेक्षा नांदेड परिसरात शेतीचं जास्त नुकसान. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत करणार.’ अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT