मुंबईतील धार्मिक स्थळं, मॉल बंद होण्याची शक्यता, महापौर किशोरी पेडणेकरांचे संकेत
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता महापालिका प्रशासन लवकरच मॉल आणि मंदिर बंद करण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. आजपासून शहरात हे नवे निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्याच्या घडीला ४ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या रुग्णसंख्येकडे पाहता किशोरी पेडणेकर यांनी […]
ADVERTISEMENT
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता महापालिका प्रशासन लवकरच मॉल आणि मंदिर बंद करण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. आजपासून शहरात हे नवे निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्याच्या घडीला ४ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या रुग्णसंख्येकडे पाहता किशोरी पेडणेकर यांनी शहरात नव्याने निर्बंध लागू करण्याबद्दलचे संकेत दिले आहेत. शहरात एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत असताना लोकं अजुनही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणं थांबवत नाहीयेत. शुक्रवारी दादरच्या भाजी मार्केट परिसरात अशा पद्धतीने गर्दी जमा झाली होती.
ADVERTISEMENT
Maharashtra: Crowd seen at Dadar vegetable market in Mumbai this morning. Mumbai reported 8,646 new #COVID19 cases yesterday. pic.twitter.com/9xkwPgBXGy
— ANI (@ANI) April 2, 2021
शहरातील हॉटेल्समध्ये यापुढे एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच संधी दिली जाऊ शकते. तर शहरातील सर्व धार्मिक स्थळं यापुढे बंद करण्यात येऊ शकतात. महापालिका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुन लोकं गर्दी करत असल्याचं किशोरी पेडणकेर यांनी म्हटलंय. मुंबईतला लोकल प्रवास हा पहिल्याप्रमाणे फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांपुरता मर्यादीत केला जाऊ शकतो. याव्यतिरीक्त शहरातील मॉल, थिएटरही पूर्णपणे बंद केली जाऊ शकतात. याव्यतिरीक्त खासगी कार्यालयांमध्ये लोकांना दोन शिफ्टमध्ये काम करण्यासाठी सांगितलं जाण्याची शक्यता आहे.
मुंबईत काल दिवसभरात कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाला आहे. काल दिवसभरात मुंबईत ८ हजार ६४६ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात ५ हजार ३१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण ३ लाख ५५ हजार ६९१ रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८४ टक्के आहे. डबलिंग रेट ४९ दिवसांवर गेला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
हे वाचलं का?
#CoronavirusUpdates
1-Apr; 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 8,646
Discharged Pts. (24 hrs) – 5,031
Total Recovered Pts. – 3,55,691
Overall Recovery Rate – 84%Total Active Pts. – 55,005
Doubling Rate – 49 Days
Growth Rate (25 Mar-31 Mar) – 1.38%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 1, 2021
मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील कोरोना बाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढते आहे. या बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांची व सौम्य लक्षणं असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना बहुतांशी घरी विलगीकरण करुन औषधोपचार दिले जातात. त्याआधारे ते पूर्णपणे बरे देखील होतात. गृह विलगीकरणात असलेल्या अशा प्रकारच्या बाधितांची लक्षणीय संख्या पाहता संबंधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक यासह वैद्यकीय मंडळी आणि रुग्णशय्यांचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वॉर्ड वॉर रुम यांच्यासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने विविध सूचना समाविष्ट असलेले सुधारीत परिपत्रक लागू केले आहे.
ADVERTISEMENT
गृह विलगीकरणासाठी पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जे रुग्ण कोविड चाचणी केल्यानंतर बाधित आढळले आहेत, अशा रुग्णांना घरी विलगीकरण करता येवू शकते. त्यासाठी
ADVERTISEMENT
(१) लक्षणे नसलेले बाधित (असिम्प्टोमॅटिक)
(२) सौम्य लक्षणं असलेले (म्हणजे ज्यांना सहव्याधी नाहीत, ताप १०० फॅरनहाईटपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा अधिक आहे व इतर सामान्य निकष)
(३) प्रौढ व सहव्याधी असलेले असे रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत, त्यांची केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या एकत्रित सल्ल्याने विलगीकरण करता येऊ शकेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT