Maharashtra Lockdown: …अन् हजारो मजुरांनी मुंबई सोडली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (13 एप्रिल) राज्यात लॉकडाऊनबाबत घोषणा केली. आज (14 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून पुढील 15 दिवसांसाठी राज्यभरात कठोर लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री ही घोषणा करताच अवघ्या काही तासात हजारो प्रवासी मजुरांनी मुंबई सोडून आपल्या गावाची वाट धरली.

ADVERTISEMENT

काल रात्री 10 वाजेच्या सुमारास मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी कामगारांची गर्दी दिसून आली. राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आल्याने कामगारांना आपल्या रोजी-रोटीचा प्रश्न सतावू लागला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाची वाट धरली. मात्र, असं असलं तरीही राज्यात गेल्या वर्षीप्रमाणे अगदीच कठोर लॉकडाऊन करण्यात आलेलं नाही. या लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे.

राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने आता आपला रोजगार बंद होईल आणि त्यानंतर खाण्यापिण्याची भ्रांत होईल. या भीतीने अनेक जणांनी आता आपआपल्या गावी जाणं पसंत केलं आहे. यावेळी जे कामगार रेल्वे स्टेशनवर होते त्यापैकी अनेक जण हे गेल्या लॉकडाऊननंतर आपल्या गावी हे मोठ्या खडतर पद्धतीने प्रवास करत पोहचले होते. त्या आठवणी आजही त्यांच्यासाठी फारच भयानक आहेत आणि म्हणूनच आता सरकारने लॉकाडाऊन जाहीर करण्यसाठी एक दिवसांचा कालावधी दिल्याने काल रात्रीच मजुरांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

Corona चा कहर! राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, केल्या पाच महत्त्वाच्या मागण्या

दरम्यान, यापैकी अनेक मजूर हे परप्रांतीय आहे. त्यात अधिकतर हे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. लॉकडाऊनमुळे इथं काम मिळणार नाही आणि पर्यायाने खाण्यापिण्याचे वांदे होतील त्यामुळ गावी जाऊन शेतीतून जेवढं उत्पन्न मिळेल त्यावर गुजराण करु असं अनेकांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे कोरोनाचं संक्रमण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने देखील बरेच नियम लागू करत प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे अशाच लोकांना प्रवास करु दिला जात आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने आरपीएफ, जीरआपी आणि लोकल पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

आज रात्री 8 वाजेपासून ते 1 मे सकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात कलम 144 लागू असणार आहे. यादरम्यान कुणालाही विनाकारण घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. फक्त अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय गोष्टींसाठीच नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने Break The Chain ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT