जबरदस्त फिटनेस तरीही गायक KK कसे ठरले कार्डियक अरेस्टचा बळी?
मुंबई: प्रसिद्ध गायक केके यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान केकेची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच केके यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे, परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक काम करणं बंद करतं. वयाच्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: प्रसिद्ध गायक केके यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान केकेची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच केके यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे, परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक काम करणं बंद करतं. वयाच्या 53व्या वर्षीही केके पूर्णपणे तंदुरुस्त आणि तरुण दिसत होते. अशा परिस्थितीत केके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. शोदरम्यानच केके यांना छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेत असतानाचा केके यांचा मृत्यू झाला.
तरुण ठरत आहेत हृदयविकाराचे बळी
केके यांच्या आधीही अनेक सेलिब्रिटींना कमी वयात हृदयविकाराचा झटका आला आहे. गेल्या वर्षी 29 ऑक्टोबरला साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याचे वयही अवघे 46 वर्ष होते. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचेही गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होत्या. 40व्या वर्षी त्याच्या मृत्यूनेही सर्वांना धक्का बसला होता.