पैशांची उधळण, मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा ! लॉकडाउनचे नियम मोडत खासदार जलील रंगले कव्वाली कार्यक्रमात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला असला तरीही अद्याप संकट टळलेलं नाही. अशा परिस्थितीत सरकार एकीकडे लोकांना निर्बंध पाळण्याचं आवाहन करत असताना लोकप्रतिनिधी मात्र सर्रास नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनीही विकेंड लॉकडाउनचे नियम धाब्यावर बसवत एका कव्वाली कार्यक्रमात भाग घेतल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

दौलताबाद रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत हा कव्वालीचा कार्यक्रम पार पडल्याची माहिती मिळते आहे. शहरातली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता औरंगाबादमध्ये विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. परंतू खासदार जलील सहभागी झालेल्या या कार्यक्रमात कोणतेही नियम पाळले गेल्याचं दिसलं नाही.

आभाळ कोसळणार आहे का? कोरोना काळातही राजकीय सभा घेणाऱ्या नेत्यांना हायकोर्टाने फटकारलं

हे वाचलं का?

खासदार जलील कार्यक्रमस्थळी येताच त्यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली. सहभागी व्यक्तीपैकी एकाही माणसाने मास्क घातलेला नव्हता. गाण्याच्या तालावर मंडळी सोशल डिस्टन्सिंगचं भान विसरुन नाचताना दिसली. खासदार जलिल ज्या ठिकाणी बसून या कार्यक्रमाचा आनंद घेत होते तिकडेही मास्क-सोशल डिस्टन्सिंग अशा कोणत्याही नियमांचं पालन होताना दिसलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नियम हे फक्त सामान्यांसाठीच असतात का असा सवाल औरंगाबादचे नागरिक विचारत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन याविषयी काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT