अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल-डिझेल होतं पण Narendra Modi सारखा नेता नव्हता – बबिता फोगाट
अफगाणिस्तानातून अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर तालिबानी अतिरेक्यांनी देशातली सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळून गेल्यानंतर आता अफगाणिस्तानात तालिबानी राजवट लागली आहे. संपूर्ण जगभरात या घटनेचे पडसाद उमटत असताना भारतात मात्र वेगळाच सूर आळवला जात आहे. कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाटने या प्रकरणात, अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल, डिझेल होतं पण मोदींसारखा […]
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानातून अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर तालिबानी अतिरेक्यांनी देशातली सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळून गेल्यानंतर आता अफगाणिस्तानात तालिबानी राजवट लागली आहे. संपूर्ण जगभरात या घटनेचे पडसाद उमटत असताना भारतात मात्र वेगळाच सूर आळवला जात आहे.
ADVERTISEMENT
कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाटने या प्रकरणात, अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल, डिझेल होतं पण मोदींसारखा नेता नव्हता असं म्हणत ट्विट केलंय.
अफगानिस्तान के पास सस्ता पेट्रोल था, सस्ता डीजल था औऱ सस्ती प्याज़ भी थी पर नरेंद्र मोदी जैसा नेता नही था।
— Babita Phogat (@BabitaPhogat) August 16, 2021
बबिता फोगाटच्या या ट्विटला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही प्रतिसाद दिला आहे. बबिता फोगाटप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही या विषयावर आपलं मत व्यक्त केलंय. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये कंगनाने अफगाणिस्तानाच सुरु असलेल्या हिंसाचाराचे काही फोटो शेअर करत आज आपण हे शांतपणे पाहत आहोत उद्या हे आपल्यासोबतही होऊ शकतं असं म्हटलं आहे. परंतू आपल्यासोबत मोदीजी आहेत, त्यामुळे चिंता करायची गरज नाही.
हे वाचलं का?
दरम्यान, अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) ताब्यात गेल्यापासून तेथील परिस्थिती ही सतत बिघडत चालली आहे. येथील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी, एएनआय या वृत्तसंस्थेला अशी माहिती दिली आहे की, भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने 120 हून अधिक भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन काबूलहून उड्डाण केले आहे. या लोकांना रात्री उशिरा विमानतळाच्या सुरक्षित भागात आणून नंतर इथून बाहेर काढण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT