एकनाथ शिंदेंच्या बंडाला बाळासाहेबांच्या पुत्राचा पाठिंबा, वाचा काय म्हणाले जयदेव ठाकरे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेचे दोन दसरा मेळावे आज मुंबईत पार पडत आहेत. एक मेळावा आहे एकनाथ शिंदे यांचा तर दुसरा मेळावा आहे उद्धव ठाकरेंचा. एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडतो आहे तर उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडतो आहे. अशात एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर आज बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव जयदेव ठाकरेही आले. जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे जयदेव ठाकरे यांनी?

“खरं म्हणजे मी इकडे आलोय. आम्ही ठाकरे कधी भाषणं लिहून आणत नाही. एकनाथ शिंदे माझा आवडीचा आहे. आता ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एकनाथऱाव असं म्हणावं लागेल. पाच सहा दिवस झाले मला एक-एक फोन येत आहेत की तुम्ही शिंदे गटात गेलात का? अरे हा ठाकरे कुणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथरावांनी जी भूमिका घेतली आहे ती मला आवडली. असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवा आहे. मी त्यांच्या प्रेमाखातर इथे आलो होतो.”

एकनाथ शिंदे यांना कुणीही अंतर देऊ नका

“आपला एक इतिहास आहे चिपळ्या वाजवणाऱ्यांना एकनाथांना त्यांच्या जवळच्यांनीच संपवलं. पण तुम्ही या एकनाथ शिंदेंना एकटं पाडू नका. एकनाथच राहुद्या.. ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. एकनाथराव जे काही कामं करत आहेत ती गोरगरीबांसाठी आहे. शेतकऱ्यांसाठी कामं करत आहेत. एकनाथ शिंदे हे मेहनत करणारे आहेत त्यांना दुरावा देऊ नका. माझं तर असं म्हणणं आहे की आता हे सगळं बरखास्त करा आणि शिंदे राज्य येऊ द्या. सगळं बरखास्त करा परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्या. ” असं महत्त्वाचं वक्तव्य जयदेव ठाकरे यांनी बीकेसी मैदानावरच्या एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात केलं आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेचे दोन दसरा मेळावे

आज जयदेव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात आले. तसंच स्मिता ठाकरेही याच दसरा मेळाव्यात आले. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा पार पडतो आहे. शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवसेनेत पडलेली ही उभी फूट आहे. अशात ठाकरे कुटुंबही आपल्या बाजूने आहे हे एकनाथ शिंदे यांनी दाखवलं कारण जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, बिंदुमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरे हे सगळेजण शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात आले. तसंच एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन या निमित्ताने केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT