Tauktae Cyclone : वांद्रे-वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, मुंबई महापालिकेची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Tauktae वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतला सुप्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता हा सी लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. काही वेळापूर्वीच ही घोषणा मुंबई महापालिकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केली आहे. Tauktae या वादळाचा चांगलाच तडाखा मुंबईला बसला. गेट वे ऑफ इंडियाच्या बाहेर समुद्राचं पाणी साठलं होतं. तसंच मुंबईत दिवसभर पाऊसही होता.

ADVERTISEMENT

Tauktae वादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये या वादळाने कहर माजवला होता. सर्वात जास्त नुकसान झालं ते रायगड जिल्ह्याचं. मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून सी लिंक बंद ठेवण्यात आला होता. लोकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. आता मात्र हा सागरी सेतू सुरू करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

मुंबईतला वांद्रे-वरळी सी लिंक (Sea Link ) अर्थात सागरी सेतू हा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. . मुंबई महापालिकेने ट्विट करून तशी माहिती दिली होती. वांद्रे-वरळी सी लिंक वापरणाऱ्यांनी तिथे जाऊ नये, पर्यायी मार्गांचा वापर करावा असं मुंबई महापालिकेने म्हटलं होतं. एवढंच नाही तर गरज नसल्यास मुळीच घराबाहेर पडू नका असंही मुंबई महापालिकेने म्हटलं होतं. खरंतर शनिवारीच या संदर्भातली माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईला चक्रीवादळाचा धोका नाही पण आपण खबरदारी घेत आहोत असंही त्यांनी म्हटलं होतं. पण मुंबईत पावासचा जोर वाढला आहे. त्यामुळे वांद्रे-वरळी सी लिंक हा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता आता हा सागरी सेतू पुन्हा सगळ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT