भीषण! दिल्लीतल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये Oxygen न मिळाल्याने 8 रूग्णांचा मृत्यू
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. अशात ऑक्सिजन तुटवडा, रेमडेसिवीरचा तुटवडा आणि लसींचा तुटवडा भासतो आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांमध्येही हीच स्थिती आहे. ऑक्सिजन उपलब्ध न होऊ शकल्याने दिल्लीतल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये Covid रूग्णालयाला आग, 16 जणांचा मृत्यू दिल्ली उच्च न्यायालयात माहिती देताना रूग्णालय प्रशासनाने सांगितलं […]
ADVERTISEMENT
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. अशात ऑक्सिजन तुटवडा, रेमडेसिवीरचा तुटवडा आणि लसींचा तुटवडा भासतो आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांमध्येही हीच स्थिती आहे. ऑक्सिजन उपलब्ध न होऊ शकल्याने दिल्लीतल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
गुजरातमध्ये Covid रूग्णालयाला आग, 16 जणांचा मृत्यू
दिल्ली उच्च न्यायालयात माहिती देताना रूग्णालय प्रशासनाने सांगितलं की रूग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. तासाभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. त्यामुळे बत्रा रूग्णालयात झालेल्या घटनेत एका डॉक्टरसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. दुपारी १२ वाजता ऑक्सिजन संपला होता. दीड वाजता आम्हाला ऑक्सिजन मिळाला. तेवढ्या वेळात ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या काळात दिल्लीत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान हे सांगितलं की आमच्याकडे ऑक्सिजन मिळण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे.
हे वाचलं का?
भारतात Corona संकट गहिरं, ‘या’ देशाने दिला मदतीचा हात, पुरवणार Oxygen concentrator
कोव्हिडचे 6 रूग्ण जे आयसीयूमध्ये होते आणि मुख्य वॉर्डमधले 2 जण अशा आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आम्ही त्या सगळ्यांचा जीव वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण आम्हाला त्यामध्ये यश आलं नाही. दुसरी लाट देशात आली आहे तेव्हापासूनच आम्ही ऑक्सिजनची मागणी सरकारकडे करतो आहोत असं बत्रा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एससीएल गुप्ता यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
आमचे कार्यकारी अधिकारी हे सातत्याने सरकारच्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडे ते ऑक्सिजनची मागणी करत आहेत. आयनॉक्स आणि गोएल या दोन ऑक्सिजन पुरवठादारांकडेही आम्ही मागणी करण्यासाठी संपर्क केला मात्र त्यांनी आमचा फोनच उचलला नाही असंही डॉ. गुप्ता यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
अरविंद केजरीवाल यांनी काय म्हटलं आहे?
दिल्लीत अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. आम्ही याबाबत कोर्टालाही पत्र लिहिलं आहे. आम्हाला 976 टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र आम्हाला 490 टनच ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आला आहे. शुक्रवारी तर आम्हाला फक्त 312 टन ऑक्सिजन मिळाला असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसंच दिल्लीतल्या बत्रा रूग्णालयात घडलेल्या घटनेबद्दल शोकही व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT