बीडमध्ये अस्वस्थ करणारी घटना! पुण्यातील महिलेवर नात्यातील तरुणांकडून सामूहिक बलात्कार

मुंबई तक

राज्यात महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ज्वलंत बनलेला असताना बीड जिल्ह्यात अस्वस्थ करणारी घटना घडली आहे. नात्यातील चार तरुणांनीच महिलेला ब्लॅकमेल करत सामूहिक अत्याचार केला. अहमदनगर, बीड जिल्ह्यात अत्याचार घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्या आली आहे. बीडमधील एका २४ वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या तरुणाने अहमदनगर शहरात अत्याचार केला. दुसऱ्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राज्यात महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ज्वलंत बनलेला असताना बीड जिल्ह्यात अस्वस्थ करणारी घटना घडली आहे. नात्यातील चार तरुणांनीच महिलेला ब्लॅकमेल करत सामूहिक अत्याचार केला. अहमदनगर, बीड जिल्ह्यात अत्याचार घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्या आली आहे.

बीडमधील एका २४ वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या तरुणाने अहमदनगर शहरात अत्याचार केला. दुसऱ्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केला. तिन्ही नराधमांनी रात्रभर छेड काढली. नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं, बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यासह पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार २४ वर्षीय विवाहिता आपल्या २ लहान मुलं, नवरा आणि सासुसह पुण्यात राहते. मात्र, नवऱ्यासोबत ४ एप्रिल रोजी किरकोळ भांडण झाल्यानं, ती माहेरी बीडला आली होती. माहेरी आल्यानंतर ‘तू एकटीच का आली? तू परत तुझ्या नवऱ्याकडे जा,” पीडितेला तिच्या आईनं सांगितलं.